YouTube

Thursday, 3 October 2019

सुख माझ्या नजरेतून- मंगेश पाडगांवकर

सुख सुख म्हणजे  नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..
भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं,
सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं,
नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..
साधीशी कढी
सुद्धा मनाजोगी जमणं,
हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,
डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..
एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं,
वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं,
टपरी वरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....
एखाद्या चिमणीला जवळून बघणं,
हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं,
एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....
खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,
रातराणीचा सुगंध उरात साठवणं,
पलंगावर पाठ टेकली की
क्षणात डोळा लागणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं...

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...