#कान्हाने तुमच्या सतावल ग। नाही कस म्हणता ।। धृ।।
#यमुने तिरी घागरी शिरी। खडे हा मारी।
घागरी याने फोडल्या ना। नाही कस म्हणता ।। १।।
घरात घुसुनी #दही #दूध नासुनि। #लोण्याचे गोळे खाल्ले की ग।
नाही कस म्हणता ।। २।।
#वस्र आमचे #कळंबावरी ठेवून दुरी। #पाण्याच्या बाहेर या म्हणतो।
नाही कस म्हणता ।। ३।।
आम्ही #मंदिरी मंचकावरी झोपलो। तरी #दाढीशी #वेणी याने बांधली।
नाही कस म्हणता ।। ४।।
#नाहत होते मी मागचे #अंगणी। सांगू नका कोणी सांगयाची #लाज वाटते ना।
नाही कस म्हणता ।। ५।।
आला कुठून नयनी पाहुन। माझ्या मागुनी #सासुने मारले की ग।
नाही कस म्हणता ।। ६।।
#गोठयात #गाई दावने नाई बंधलेल्या। पायी #बैलच ठाई बांधले ना।
नाही कस म्हणता ।। ७।।
खटयाळ तुम्ही साऱ्या #गवळनी। गा-हाने उगी मला बोलवुनी करती।
नाही कस म्हणता ।। ८।।
#राधेच्या घरी गेल हा हरी झोपाळ्यावरी। #लहरिन मोठा हा झाला ना।
नाही कस म्हणता ।। ९।।
No comments:
Post a Comment