सुध बुध माझी हरवली। नको वाजवू #कान्हा तुझी #मुरली ।।धृ।।
#घागर घेवूनी #पाणीयासी जाता। डोईवरी घागर पाझरली।
नको वाजवू कान्हा तुझी मुरली ।।१।।
घरी करीत होते घर #कामधंदा। तेथेच मी गडबडली।
नको वाजवू कान्हा तुझी मुरली ।।२।।
एका #जनार्दनी पुर्ण कृपेने। #राधा #गवळन बावरली।
नको वाजवू कान्हा तुझी मुरली ।।३।।
No comments:
Post a Comment