का ग #राधे #गोकुळ सुटले।
काल मला #कृष्णाने लुटले।।धृ।।
घागर घेवून #पाणीयासी जाता।
घागरीचे काठ ही फुटले।
का ग राधे गोकुळ सुटले।।१।।
#दही #दूध घेवूनी #मथुरेसी जाता।
दह्या दुधाचे माठही फुटले।
का ग राधे गोकुळ सुटले।।२।।
एका #जनार्दनी पूर्ण कृपेने।
#जन्म #मरणाचे #बंधन सुटले।
का ग राधे गोकुळ सुटले।।३।।
No comments:
Post a Comment