#जाच #सासुचा सोसेना।
कुणी #माहेरच येईना।।धृ।।
#माय #बाप गेले दोन्ही।
आता उरल नाही कोणी।
जाच सासुचा सोसेना।
कुणी माहेरच येईना।।१।।
आता सरली माझी वाट।
दोन्ही कड़े आला विट।
जाच सासुचा सोसेना।
कुणी माहेरच येईना।।२।।
#जनी म्हणे ऐश्या रीति।
झाली #ब्रम्हांड #फजीती।
जाच सासुचा सोसेना।
कुणी माहेरच येईना।।३।।
👍
ReplyDelete