बाई या #कान्हाने लाजच सोडली।
माझ्या हाताची #बांगडी फोडली।।धृ।।
#घागर घेवून #पाणीयासी जाता।
वाटेत आडवा कान्हा उभा होता।
मागे येवून #वेणी माझी ओढली।
माझ्या हाताची बांगडी फोडली।।१।।
#दह्या #दुधाचा #माठ डोईवरी।
त्याची #नजर माझ्यावरी।
हळूच येवून #बासरी वाजविली।
माझ्या हाताची बांगडी फोडली।।२।।
एका #जनार्दनी विनविते #राधा।
शरण आले रे तुला #गोविंदा।
वाट दाखवा तुम्हीच सदा।
माझ्या हाताची बांगडी फोडली।।३।।
Thanks for this useful blog you can visit tuliptales.com if you want to buy USB Heated Jacket for winter (Long Sleeves).Do not Wring this jacket by hand
ReplyDelete