#कृष्णा तुला मी दिसते कशी
नेसलाय शालू आज #बनारसी।।धृ।।
पाच रंगाचा सात सुतांचा धागा।
सोळा #जरी बुटयाचा चौपदारी मी नेसु कशी।
नेसलाय शालू आज बनारसी।।१।।
#वेणी मध्ये घालुनी #फूल। भांगामध्ये भरूनी #गुलाल।
कान्हा संगे मी नटेल कशी। नेसलाय शालू आज बनारसी।।२।।
#ठुमकत मुरडत माझी चाल। माझ्या संगे नको होवू बेजार।
गावा मध्ये मी राहू कशी। नेसलाय शालू आज बनारसी।।३।।
#मैत्रीणि साऱ्या येवून जमती। तुझी माझी मस्करी चोरुन पाहती।
त्यांच्या मध्ये मी राहू कशी। नेसलाय शालू आज बनारसी।।४।।
#संत सखुमनी आनंद झाला। जावूनी सांगा #पाण्डुरंगाला।
व्रत करते मी #एकादशी। नेसलाय शालू आज बनारसी।।५।।
No comments:
Post a Comment