Image credit - The Bhakti
रोज रोज मागतो हा दुध लोणी साय ग।
बाई तुझ्या #कृष्णाचं करू तरी काय ग ।। धृ।।
बाई तुझ्या #कृष्णाचं करू तरी काय ग ।। धृ।।
विकायासी जात होते #मथुरा बाजारी।
पाठी मागे येवून धरीतो पदर ग बाई धरीतो पदर।
उचलेना पाय बाई चलवेना वाट ग।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। १।।
पाठी मागे येवून धरीतो पदर ग बाई धरीतो पदर।
उचलेना पाय बाई चलवेना वाट ग।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। १।।
#यमुनेच्या तीरावर करीती अंघोळी ग
जावूनिया बैसे हरी #कळंबाच्या स्थळीं हो कळंबाच्या स्थळीं।
वस्त्र घेवूनिया हरी पळूनच जाईन ग।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। २।।
जावूनिया बैसे हरी #कळंबाच्या स्थळीं हो कळंबाच्या स्थळीं।
वस्त्र घेवूनिया हरी पळूनच जाईन ग।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। २।।
दाढी वेणीची याने गाठ कशी पाडली ग।
वेडया परी गती बा आमुचेही केली ग ।
चाकु, सुरी, कातरीचा चालेना उपाय।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। ३।।
वेडया परी गती बा आमुचेही केली ग ।
चाकु, सुरी, कातरीचा चालेना उपाय।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। ३।।
#मिरा म्हणे #बासरीचा लावूनिया छंद।
ग्रह कामे सारे याने पाडलेच बंद।
भूलपितो चित्त माझे हाच #यदुराज ग।
रोज रोज मागतो हा दुध लोणी साय ग।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। ४।।
ग्रह कामे सारे याने पाडलेच बंद।
भूलपितो चित्त माझे हाच #यदुराज ग।
रोज रोज मागतो हा दुध लोणी साय ग।
बाई तुझ्या कृष्णाचं करू तरी काय ग ।। ४।।
No comments:
Post a Comment