YouTube

Friday, 28 September 2018

स्त्री

खरंतर पुरुषाला स्त्री अजून कळलीच नाही .म्हणूनच 'अमृता प्रीतम ' सारख्या लेखिका लिहीतात '' संपुर्ण स्त्री खूप कमी लोकांना मिळते '' तिच्यातल्या त्या आवेगासह , त्या उर्मीसह ,त्या उत्कट भावनांसह .या अलंकारांनी अलंकृत स्त्री नाही झेपत साध्या पुरुषत्वाला . त्यासाठी त्या पुरुषाजवळ ही धीराची , संयमाची , बुद्धिची जोड असावी लागते . तिला तोलुन धरण्याचे सामर्थ्य असावं लागतं . तिच्या लैंगिकतेच्या , सेक्सच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत . तिचे भावविश्व , तिचे भावबंध खूप निराळे आहेत .
पुरुष हा स्त्रीच्या शरीराशी संभोग करतो पण स्त्री ही भावनांशी संभोग करते .म्हणूनच तर पोट भरण्यासाठी वेश्याव्यवसाय करणारी एखादी स्त्री शंभर माणसासोबत शय्यासोबत करून ही स्वतःला पवित्र मानते कारण तिथे तिचे शरीर तिचं भांडवल असतं त्यात मन आणी भावना नसतात .पण पुरुषाला दिसतं फक्त शरीर आणी त्याची ईच्छापूर्ती इतकंच . स्त्रीच्या बाबतीत भावना आणी मन महत्वाचे .
एखादा नग्न पुरूषी देह बघून तिच्या भावना नाही चाळवल्या जात . नाही होत ती उत्तेजित .पण कधी कधी एखादया पुरुषाची एक नजरच तिच्या मनात उलथापालथ घडवून आणते . एखादया पुरुषाचे दिलखुलास हास्य तिला घायाळ करून जाते . एखादया आवडत्या पुरूषाचे आजुबाजुला असणे ही तिला मनातून मोहरून टाकते .
एखादया पुरुषाची बुद्धिमत्ता ,वाक् चातुर्य तिला त्याच्या सहवासात घेवुन जाते . किती तरी वेळा ती अशा काल्पनिक संभोगात रमते .स्वतःला हवं तसं .पण हे सारं मनात . आणी हे मनातलं ती कधीच बोलून दाखवत नाही .कारण तितकं स्वातंत्र्य आपण तिला कधी उपभोगुच दिलं नाही. तिला ही तिच्या भावाचे मित्र , कॉलेजचे मित्र आवडत असतात . कुणाचं टॉल , डार्क , हॅण्डसम असणं , कुणाची बुद्धिमत्ता , कुणाचं हीरो असणं , कुणाचं माचो दिसणं , कुणाचा खट्याळ स्वभाव , कुणाचे बोलके डोळे , कुणाचा टपोरीपणा सुद्धा तिला आकर्षित करतो .
तिला नुसताच पुरूषी देह नाही तर त्यातील भावना ही हव्या असतात .तिला जाणुन घेण्याचा , समजून घेण्याचा तो हळवा प्रवास हवा असतो . तिला ते रोमांचित करणारे शब्द हवे असतात .
डोळ्यांतील मुग्ध भाव हवे असतात . नुसत्या नाजुक स्पर्शाने ही खुलते ती . तिला फक्त शब्दांनी ,स्पर्शानी उमलविण्याचि गरज असते . तिच्या स्त्रित्वाला जागृत करण्याची गरज असते . तिला उन्मुक्त व्हायला आवडते पण त्यासाठी आधी ती मुक्त व्हायला हवी .
ती स्वतःच पुरुषाला दैहिक सुखाच्या त्या विलक्षण स्वर्गात नेवू शकते .जिथं असते फक्त उन्माद ,आवेग ,प्रेम ,स्पर्श , ती विलक्षण अनुभूती , ती उत्कटता , ती मादकता . तेव्हाच गवसेल तो तृप्तीच्या उत्कटबिंदुचा वरदहस्त . तेव्हाच सजीव होईल त्याच्या डोळ्यात आणी तिच्या देहात ती खजुराहो ची शिल्प . तेव्हाच अनुभवता येते तो स्त्री पुरुष मिलनाचा अलौकिक सोहळा .
फक्त तिच्यात , फक्त तिच्यातच मिळेल तुला तुझा पुर्ण पुरुष असण्याचा मान .
पुरुषोत्तम असल्याचा अभिमान .

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...