YouTube

Friday 28 September 2018

गुलाबाई

🌼❄🌼 गुलाबाई 🌼❄🌼

आठवते का सख्यानो गुलाबाई .
आपल्या खानदेशात साजरे होणारे उत्सव व सण तसेच त्यापाठीमागे त्या त्या सणाचे निश्चित महत्त्वही आहे.व ते सण साजरे करण्यात एक वेगळा आनंदही असतो.मला अजूनही आठवतात ती म्हणजे गुलाबाईची गाणी.आम्ही भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत गुलाबाई बसवायचो. आम्ही सगळ्या मुलीं फेर घेऊन गाणी म्हणायचो. आजही आम्ही सर्व बहिणी जमलो की गंमत म्हणून  गुणगुणतो.त्यातीलच ही काही गाणी..आठवताय की नाही तुम्हाला .
भाद्रपद पौर्णिमेला विराजमान होणाऱ्या गुलाबाईचा महिनाभर मुक्काम असतो. मुळात मुलींसाठी असणारा हा उत्सव घराघरात उत्साह निर्माण करणारा ठरतो. संध्याकाळी गुलाबाईची पुजा व टिपऱ्या खेळताखेळता तिच्यासाठी मुली गाणी गातात. गाण्यांनंतर गुलाबाईसाठी असणारा खाऊ ओळखण्याचीही गंमत न्यारीच असते. शहरातून वेगाने कमी होत असला तरी खान्देशाच्या ग्रामीण भागात आजही हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुलाबाईसोबत पती गुलोजी राणा म्हणजे भगवान शंकर व पुत्राची सुद्धा स्थापना केली जाते. गुलाबाईंच्या मूर्तीभोवती सजावट केली जाते. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. कोजागिरीेला गुलाबाई-गुलोजी यांना ३२ खाऊंचा नैवद्य दाखविला जातो. चिमुकल्यांसाठी असलेल्या या उत्सवात घरातील बायकासुद्धा बालपण अनुभवात.कोजागिरीला चंद्राच्या चांदण्यात बासुंदी केली जाते . जागरण करून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात गाणी म्हणत टिप-यावर ताल ध़रत सर्व जणी धमाल करतात .खाऊ ओळखला की सर्वांना वाटला जातो . छान अंगत पंगत होते . बासुंदी प्यायला दिली जाते . नंतर गुलाबाईच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात येते . आणि महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची सांगता होते.

       🌼🌼🌼गुलाबाईची गाणी🌼🌼🌼

१)  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वेळवीला भात
जेविता कंठ राणा गुलाबाईचा.
ठोकीला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
टिकाऊचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी
झळकतीचे एकच पान
दुरून गुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळझुळ वाहे
ताव्या पितळी नाय गं
हिरवी टोपी हाय गं
हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो
सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई
चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं
खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली
तळय़ा तळय़ा ठाकुरा
गुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर कुंकू लावू द्या
तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या
तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय
आउले पाऊल नागपूर गांव
नागपूर गावचे ठासे ठुसे
वरून गुलाबाईचे माहेर दिसे.

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

२)      सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या गुलाबाईला रे
माझ्या गुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
गुलाबाचे फूल माझ्या गुलाबाईला रे
माझ्या गुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
मोगऱ्याची फुले माझ्या गुलाबाईला रे
माझ्या गुलाबाईला.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

३)    अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं. आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी गुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंदाचा बैल येईल डोलत,
सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीर.

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

४)     नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,
आता माझे दादा येतील गं, येतील गं,
दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,
दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

५)    हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?
कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीला फूल लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीला फूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीला कारले लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या सासर्यााला, सासर्याlला
मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा
मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या नवर्या ला, नवर्‍याला
स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा
”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄

६)    गुलाबाई गुलाबाई
सासु कशी? सासु कशी?
चुलीवर बसलेली मांजर जशी,
गुलाबाई गुलाबाई सासरा कसा?
झाडावर बसलेला माकड जसा
गुलाबाई गुलाबाई जेठ कसे
रुपायातले आठाणे जसे
गुलाबाई गुलाबाई जाऊ कशी
आठाण्यातली चाराणी जशी.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄

७)    यादवराया राणी रुसून बसली कैसी
सासुरवाशीण सून घरासी येईना कैसी
सासुबाई गेल्या समजावयाला
चला चला सुनबाई आपुल्या घराला
अर्धा संसार देते तुम्हाला
अर्धा संसार नक्को मला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवराया राणी रुसून बैसली कैसी…
मग सासरे, नणंद, दिर, भाऊ…
असे समजावयाला येतात.
अखेर ती नवर्यासोबत जाते..

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

८)    अरडी ग परडी, परडी एवढे काय गं?
परडी एवढं फुल गं, दारी मुल कोण गं?
दारी मुल सासरा, सासर्यानं काय
आणलं गं
सासर्याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दरवाजे
लाव गं बाई लाव गं बाई
झिपर्या कुत्र्याला बांधा गं बाई… बांधा
गं बाई
आणि हे गाणं नेहमीप्रमाणे…
सासर्याच्या
नावानं नवीन भेटवस्तूने शेवटी
चारी दरवाजे .. बांधा ग बाई’
जोडून चालतं राहतं ते नवरा मंगळसूत्र
घेऊन येईपर्यंत… शेवटी
चारी दरवाजे उघडा गं
बाई उघडा गं बाई
झिपर्या कुत्र्याला
बांधा गं बाई… बांधा गं बाई असं
संपत .

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

९)     एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू, झेलू बाई
तीन लिंबू झेलू,
तीन लिंबू झेलू बाई,
चार लिंबू झेलु,
चार लिंबू झेलु बाई
पाच लिंबू झेलू
पाच लिंबाचा पानोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे
असं पुढे चालत रहायचं.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

१०)    अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू,
तेथे खेळ चिलया बाळू
चिलया बाळाला भूक लागली
निज रे निज रे चिलया बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
पान, सुपारी उद्या दुपारी.

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

११)     अडकित जाऊ, खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बट्टा
गुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा
दत्ता….
अडकित जाऊ, खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ताम्हण
गुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा
वामन…
अडकीत जाऊ खिडकीत खिडकीत
होती बशी
गुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा
शशी…
अडकित जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होते कमळ
गुलोजीला मुलगी झाली, नाव ठेवा
विमल…
अडकित जाऊ खिडकीत जाऊ,
खिडकीत होते विडे
गुलोजीला मुलगा झाला गावात वाटा
पेढे.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

१२)   .ऐलमा पैलमा गणेशदेवा
माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला येशीच्या दारी
पारवं घुमतंय पारावरी
आमच्या गावच्या गुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंडय़ाची लागली टाळी
आयुष्य देरे बा भाळी
माळी गेला शेताआड
पाऊस पडला येता जाता
पडपड पावसा थेंबाथेंबी आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे
अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या
चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत
गोंडे
एकेक गोंडा वीसाविसाचा
साडय़ा डोंगर नेसायचा
नेसा गं नेसा बाहुल्यांनो अडीचशे
पावल्यांनो.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

कारल्यांचा वेल लाव गं सुने लाव गं
सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासुबाई
लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊ दे गं सुने येऊ
दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले आली हो सासुबाई
आली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…
कारल्याच्या भाजी कर गं सुने कर गं
सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा…
कारल्याची भाजी केली हो सासुबाई
केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…
कारल्याची भाजी खा गं सुने खा ग सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा…
कारल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई
खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं
हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा….
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी
माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी
माहेरा माहेरा.
संकलित.
❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐
  गुलाबाई हे एका परीने पती म्हणून शंकराच्या  प्राप्तीसाठी कठोर तप करणा-या पार्वतीचेच रुप आहे . विवाहानंतर ती माहेरी येते आणि कोजागिरीला भगवान शंकर तिला नेण्यासाठी  येतात अशीही संकल्पना या सणामागे आहे.
कविता लोखंडे....
❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹🌼❄🌼 गुलाबाई 🌼❄🌼

आठवते का सख्यानो गुलाबाई .
आपल्या खानदेशात साजरे होणारे उत्सव व सण तसेच त्यापाठीमागे त्या त्या सणाचे निश्चित महत्त्वही आहे.व ते सण साजरे करण्यात एक वेगळा आनंदही असतो.मला अजूनही आठवतात ती म्हणजे गुलाबाईची गाणी.आम्ही भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत गुलाबाई बसवायचो. आम्ही सगळ्या मुलीं फेर घेऊन गाणी म्हणायचो. आजही आम्ही सर्व बहिणी जमलो की गंमत म्हणून  गुणगुणतो.त्यातीलच ही काही गाणी..आठवताय की नाही तुम्हाला .
भाद्रपद पौर्णिमेला विराजमान होणाऱ्या गुलाबाईचा महिनाभर मुक्काम असतो. मुळात मुलींसाठी असणारा हा उत्सव घराघरात उत्साह निर्माण करणारा ठरतो. संध्याकाळी गुलाबाईची पुजा व टिपऱ्या खेळताखेळता तिच्यासाठी मुली गाणी गातात. गाण्यांनंतर गुलाबाईसाठी असणारा खाऊ ओळखण्याचीही गंमत न्यारीच असते. शहरातून वेगाने कमी होत असला तरी खान्देशाच्या ग्रामीण भागात आजही हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुलाबाईसोबत पती गुलोजी राणा म्हणजे भगवान शंकर व पुत्राची सुद्धा स्थापना केली जाते. गुलाबाईंच्या मूर्तीभोवती सजावट केली जाते. कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. कोजागिरीेला गुलाबाई-गुलोजी यांना ३२ खाऊंचा नैवद्य दाखविला जातो. चिमुकल्यांसाठी असलेल्या या उत्सवात घरातील बायकासुद्धा बालपण अनुभवात.कोजागिरीला चंद्राच्या चांदण्यात बासुंदी केली जाते . जागरण करून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात गाणी म्हणत टिप-यावर ताल ध़रत सर्व जणी धमाल करतात .खाऊ ओळखला की सर्वांना वाटला जातो . छान अंगत पंगत होते . बासुंदी प्यायला दिली जाते . नंतर गुलाबाईच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात येते . आणि महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची सांगता होते.

       🌼🌼🌼गुलाबाईची गाणी🌼🌼🌼

१)  पहिली गं गुलाबाई देवा देवा साथ दे
साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या दारी बाई वर्षां वर्षां अवसणी
अवसणीचं पाणी जसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्याने वेळवीला भात
जेविता कंठ राणा गुलाबाईचा.
ठोकीला राळा हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांब लांब झोके
टिकाऊचे डोळे हात पाय गोरे
भाऊ भाऊ टकसनी माथापुढं झळसणी
झळकतीचे एकच पान
दुरून गुलाबाई नमस्कार
एवढीशी गंगा झुळझुळ वाहे
ताव्या पितळी नाय गं
हिरवी टोपी हाय गं
हिरवी टोपी हरपली सरपाआड लपलो
सरपदादा बेटिले जाई आंवा पिकला
जाई नव्हे जुई नव्हे चिंचाखालची रानुबाई
चिंचा तोडीत जाय गं पाच पानं खाल्ली गं
खाता खात रंगली तळय़ात घागर बुडाली
तळय़ा तळय़ा ठाकुरा
गुलाबाई जाते माहेरा
जाते तशी जाऊ द्या
तांव्याभर पाण्याने न्हाऊ द्या
बोटभर कुंकू लावू द्या
तांबडय़ा घोडय़ावर बसू द्या
तांबडय़ा घोडय़ाचे उलटे पाय
आउले पाऊल नागपूर गांव
नागपूर गावचे ठासे ठुसे
वरून गुलाबाईचे माहेर दिसे.

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

२)      सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
झेंडुची फुले माझ्या गुलाबाईला रे
माझ्या गुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
गुलाबाचे फूल माझ्या गुलाबाईला रे
माझ्या गुलाबाईला॥
सा बाई सु, सा बाई सु,
बेलाच्या झाडाखाली
महादेवा तू रे महादेवा तू
हार गुंफिला, विडा रंगीला
मोगऱ्याची फुले माझ्या गुलाबाईला रे
माझ्या गुलाबाईला.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

३)    अक्कण माती चिक्कण माती
अश्शी माती सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई सपिटी दळावी
अश्शी सपिटी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्शा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा
अश्शा पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारितं. आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,
लेकी गुलाबाई साखऱ्या लेवून जाय
कशी लेवून जाय, कशी लेवू दादा,
घरी नंदा जावा, करतील माझा हेवा
नंदाचा बैल येईल डोलत,
सोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीर.

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

४)     नंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी
तेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,
आता माझे दादा येतील गं, येतील गं,
दादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,
दादा तुमची बायको चोट्टी चोट्टी
असू दे माझी चोट्टी चोट्टी
घे काठी लगाव पाठी
घरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

५)    हात जोडूनी पाया पडूनी
सासूबाई मी विनविते तुम्हाला
बावाजी आले घ्यायाला
जाऊ का मी माहेराला, माहेराला?
कारलीचे बी लाव गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीचे बी लावलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीचा वेल निघू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीचा वेल निघालाजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीला फूल लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीला फूल लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीला कारले लागू दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारलीला कारले लागलेजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीला बाजारा जाऊ दे गं सूनबाई
मग जा आपल्या माहेरा, माहेरा
कारली बाजारात गेलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
कारलीची भाजी केलीजी सासूबाई
आता तरी धाडा माहेरा, माहेरा
मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या सासर्यााला, सासर्याlला
मामाजी, मामाजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा
मला काय पुसते, बरीच दिसते
पूस आपल्या नवर्या ला, नवर्‍याला
स्वामीजी, स्वामीजी बाबा आले न्यायाला
जाऊ काजी माहेरा, माहेरा
”घेतलीय लाठी, हाणलीय पाठी,
तुला मोठं माहेर आठवते, आठवते……!!”

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄

६)    गुलाबाई गुलाबाई
सासु कशी? सासु कशी?
चुलीवर बसलेली मांजर जशी,
गुलाबाई गुलाबाई सासरा कसा?
झाडावर बसलेला माकड जसा
गुलाबाई गुलाबाई जेठ कसे
रुपायातले आठाणे जसे
गुलाबाई गुलाबाई जाऊ कशी
आठाण्यातली चाराणी जशी.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄

७)    यादवराया राणी रुसून बसली कैसी
सासुरवाशीण सून घरासी येईना कैसी
सासुबाई गेल्या समजावयाला
चला चला सुनबाई आपुल्या घराला
अर्धा संसार देते तुम्हाला
अर्धा संसार नक्को मला
मी नाही यायची तुमच्या घराला
यादवराया राणी रुसून बैसली कैसी…
मग सासरे, नणंद, दिर, भाऊ…
असे समजावयाला येतात.
अखेर ती नवर्यासोबत जाते..

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

८)    अरडी ग परडी, परडी एवढे काय गं?
परडी एवढं फुल गं, दारी मुल कोण गं?
दारी मुल सासरा, सासर्यानं काय
आणलं गं
सासर्याने आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दरवाजे
लाव गं बाई लाव गं बाई
झिपर्या कुत्र्याला बांधा गं बाई… बांधा
गं बाई
आणि हे गाणं नेहमीप्रमाणे…
सासर्याच्या
नावानं नवीन भेटवस्तूने शेवटी
चारी दरवाजे .. बांधा ग बाई’
जोडून चालतं राहतं ते नवरा मंगळसूत्र
घेऊन येईपर्यंत… शेवटी
चारी दरवाजे उघडा गं
बाई उघडा गं बाई
झिपर्या कुत्र्याला
बांधा गं बाई… बांधा गं बाई असं
संपत .

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

९)     एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू
दोन लिंबू, झेलू बाई
तीन लिंबू झेलू,
तीन लिंबू झेलू बाई,
चार लिंबू झेलु,
चार लिंबू झेलु बाई
पाच लिंबू झेलू
पाच लिंबाचा पानोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे
असं पुढे चालत रहायचं.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

१०)    अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू,
तेथे खेळ चिलया बाळू
चिलया बाळाला भूक लागली
निज रे निज रे चिलया बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
पान, सुपारी उद्या दुपारी.

❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐

११)     अडकित जाऊ, खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बट्टा
गुलोजीला मुलगा झाला, नाव ठेवा
दत्ता….
अडकित जाऊ, खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ताम्हण
गुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा
वामन…
अडकीत जाऊ खिडकीत खिडकीत
होती बशी
गुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा
शशी…
अडकित जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होते कमळ
गुलोजीला मुलगी झाली, नाव ठेवा
विमल…
अडकित जाऊ खिडकीत जाऊ,
खिडकीत होते विडे
गुलोजीला मुलगा झाला गावात वाटा
पेढे.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

१२)   .ऐलमा पैलमा गणेशदेवा
माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला येशीच्या दारी
पारवं घुमतंय पारावरी
आमच्या गावच्या गुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंडय़ाची लागली टाळी
आयुष्य देरे बा भाळी
माळी गेला शेताआड
पाऊस पडला येता जाता
पडपड पावसा थेंबाथेंबी आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे
अतुल्या मातुल्या चरणी चातुल्या
चरणी चारचोंडे हातपाय खणखणीत
गोंडे
एकेक गोंडा वीसाविसाचा
साडय़ा डोंगर नेसायचा
नेसा गं नेसा बाहुल्यांनो अडीचशे
पावल्यांनो.

❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

कारल्यांचा वेल लाव गं सुने लाव गं
सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासुबाई
लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊ दे गं सुने येऊ
दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कारल्याला कारले आली हो सासुबाई
आली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…
कारल्याच्या भाजी कर गं सुने कर गं
सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा…
कारल्याची भाजी केली हो सासुबाई
केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…
कारल्याची भाजी खा गं सुने खा ग सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा…
कारल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई
खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा…
आपलं उष्ट काढ गं सुने काढ गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
आपलं उष्ट काढलं हो सासूबाई काढलं
हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा….
आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी
माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी
माहेरा माहेरा.
संकलित.
❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐❄💐
  गुलाबाई हे एका परीने पती म्हणून शंकराच्या  प्राप्तीसाठी कठोर तप करणा-या पार्वतीचेच रुप आहे . विवाहानंतर ती माहेरी येते आणि कोजागिरीला भगवान शंकर तिला  नेण्यासाठी  येतात अशीही संकल्पना या सणामागे आहे.
❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹❄🌹

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...