आजघडीला साउंड इंजिनीअरिंग हे एक चांगले करिअर म्हणून नावारूपास येत आहे. अॅनिमेटेड आणि ग्राफिक्सवर आधारित चित्रपट, टीव्ही चॅनेल्सची क्रेझ, याशिवाय रेडिओचे बदलते स्वरूप लक्षात घेता साउंड इंजिनीअरिंगसारख्या स्पेशलाइज्ड कोर्सची मागणी आहे.
विशेष म्हणजे भारतातच नव्हे, तर विदेशामध्ये भारतीय साउंड इंजिनीअर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आज या क्षेत्रातील कामाचे स्वरूप, पात्रता आणि संधी काय? याबाबत जाणून घेऊयात...
साउंड इंजिनीअरिंग म्हणजे काय? : थोडक्यात सांगायचे तर साउंडला वेगवेगळे तंत्र वापरून श्रवणीय बनविणे म्हणजे साउंड इंजिनीअरिंग. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साउंडचा अभ्यास केला जातो. एकूणच म्युझिकला अधिक चांगले बनविण्याचे काम साउंड इंजिनीअर करतो
कामाचे स्वरूप काय? : साउंड इंजिनीअर इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल उपकरणांचा वापर करून साउंड कॅप्चरिंग, रिकॉर्डिंग, कॉपी, एडिटिंग, मिक्सिंग आणि रीप्रोड्यूसिंग करीत असतात.
पात्रता काय? : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असावे. शक्यतो सायन्स पार्श्वभूमी असल्यास फायदेशीर ठरते. कारण सायन्समध्ये वेव्हज, फ्रिक्वेन्सी, वेव्ह लेन्थ, बँड विड्थ यांचा अभ्यास केला जातो. या कोर्सकरिता संगीताचे ज्ञान बोनस ठरते.
संधी कोणत्या? : स्टुडिओ, लाइव्ह साउंड इव्हेंट, रेडिओ स्टेशन, सिंगर्स, म्युझिक कंपोझर्स, फ्रीलान्सर.
जबाबदारी काय? : स्टुडिओ मॅनेजमेंट, व्हाइस अॅण्ड इन्स्ट्रूमेंट रेकॉर्डिंग, साउंड डिझायनिंग साउंड इफेक्ट.
वेतन किती मिळते? : जर डिप्लोमा कोर्स केला तर 3 महिने इंटर्नशिप करावी लागेल. त्यानंतर सुरुवातीचे वेतन 15 हजारांपर्यंत मिळते. तुमचे स्किल पाहून 20 ते 25 हजारांपर्यंत जाते. अगदी 10 लाख रुपयांपर्यंतही पॅकेज मिळतात.
प्रशिक्षण संस्था :
● ट्रू स्कूल ऑफ म्युुझिक, मुंबई.
● मुंबई म्युझिक इन्स्टिट्यूट, मुंबई.
● एसएई टेक्नॉलॉजी कॉलेज, अंधेरी, मुंबई.
● विस्लिंग वुड्स इंटरनॅशनल, गोरेगाव, मुंबई.
● फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, लॉ कालेज रोड, पुणे.
● के. एम. इन्स्टिट्यूट, चेन्नई.
● एमजीआर गव्हर्नमेंट फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, सीआईटी कॅम्पस, चेन्नई.
● दिल्ली फिल्म इन्स्टिट्यूट, साउथ एक्सटेन्शन, दिल्ली.
● श्री ओरोबिंदो सेंटर फॉर आर्ट अॅण्ड कम्युनिकेशन, महरोली, नई दिल्ली.
● एशियन अॅकेडमी ऑफ फिल्म अॅण्ड टीव्ही, नोएडा, उत्तर प्रदेश.
● सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता, वेस्ट बंगाल.
● आडियोफिल इन्स्टिट्यूूट ऑफ साउंड इंजिनीअरिंग, कोची, केरळ.
ज्यांची ऐकण्याची क्षमता चांगली आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि धैर्य आहे अशा लोकांसाठी हा करिअर ऑप्शन म्हणजे राजमार्ग आहे.
No comments:
Post a Comment