खाली दिलेल्या वाक्यांमधून गोड पदार्थ शोधून काढायचेत. बघा तर, तुम्हाला किती सापडतात ते :
१.
विलास जेवल्याबरोबर डाराडूर झोपू नयेरे.
२.
करंडकावर आजीमाजी खेळाडूंच्या सह्या आहेत.
३.
सोपेच प्रश्न जरा अवघड पध्दतीने काढायचेत.
४.
बड्या बिल्डरने एकतर्फी व्यवहार करून फसविले.
५.
खरं तर मुलांवर वसकन ओरडायची गरज नव्हती.
६.
सखी शेजारणी तू हसत रहा हसत रहा
७.
घार उंच ढगात गेली तरी लक्ष पिलांपाशीच असते खाली.
८.
प्यारे मोहन, जरा चाय बनालो अदरक डालके.
९.
बागेतल्या इतक्या सुंदर फुलांमधून अगदी मोगराच आवडला सुंदरीला.
१०.
श्रीमान योगीचे सर्व खंड प्रसिध्द आहेत.
११.
लठ्ठपणावर उपाय भरपूर आहेत पण समजून घेतले तर ना.
१२.
गुलाब पुष्प प्रदर्शन बघायला मला जाम आवडते
१३.
मांडवी नदीवर दोन जहाजे डेरेदाखल झाली आहेत.
१४.
मुलांनो, कानगोष्टी खेळ आवडला असेल तर परत खेळूयात.
१५.
अजितची काल जुजबी चौकशीच करून पोलीसांनी सोडून दिलंय.
१६.
सुरतला जाणार असाल तर कपडे, साड्या आणि गोव्यावरून फेणी जरूर आणा.
१७.
कडक उन्हात कबूतरे वळचणीला बसली होती.
१८.
कोकण सहल ठरली बरं का, परवा निघूयात लवकर.
१९.
आम जनतेला निवडणुकीत आता जास्त रस वाटू लागला आहे.
२०.
रश्मीला संबळपूरी साडी जास्त आवडते, नेहमी नेहमी तिच नेसते.
------------------------------------

१) लाडू
२) करंजी
३) पेढा
४) बर्फी
५) खरवस
६) खीर
७) घरगे
८) मोदक
९) बासुंदी
१०) श्रीखंड
११) पणा
१२) गुलाब जाम
१३) मांड / मांडे
१४) कानवला
१५) जिलबी
१६) सुतरफेनी
१७) कतली
१८) हलवा
१९) आमरस
२०) रबडी
No comments:
Post a Comment