साहित्य
पत्ता गोबी 1 पाव
मीरे पावडर
बारीक चिरलेली हिरवी मिर्ची
थोड पनीर खिसुन ठेवलेले
ओवा - पोळपाटावर लाटून जाडससर केलेले
तिखट - चविनुसार
मीठ - चविनुसार
बारीक चिरलेली कोथिम्बीर
कणिक
तेल - भाजन्यासाठी, मोहन म्हणून
कृती:
नेहमीप्रमाणे मोहन व मीठ टाकून कणिक तिम्बुन ठेवा
पत्ता गोबी खिसुन घ्या
तेल टाकून हिरवी मिर्ची परतुन घ्या
आता गोबिचा किस टाकून परता आणि पनीर टाका
एक मिनिट हलवल्या नंतर ओवा, मीरे पावडर, मीठ, तिखट, कोथिम्बीर टाकून सारण तयार करा
आता थोड़ी कणिक घेवून त्यात पुरणपोळी सारखं सारण भरून पराठा लाटा
तव्यावर तेल सोडून भाजुन घ्या
लोणच्या सोबत किंवा दहयासोबत खायला द्या
No comments:
Post a Comment