Image credit: तरला दलाल
साहित्य:
१ कप बारीक रवा
अर्धा कप तुप
दीड कप साखर
2 कप पाणी
अर्धा कप दुध
चिमुट केशर (ऐच्छिक)
वेलदोडे पूड अर्धा चमचा
१ टेबल स्पून बेदाणे
२ बदाम
कृती
तूप चांगले गरम करा. त्यात बदामाचे काप परतून काढून ठेवा. मग रवा घालून खमंग भाजा. दुस-या ग्यासवर पाणी, साखर व बेदाणे उकळा. साखर (पाक करायचा नाही) रवा व हे पाणी एकत्र करा. दुध व केशराचा हबका मारा. तळलेले बदाम काप घाला. हा हलवा शुभप्रसंगी बनवतात. साध्या पु-याबरोबर वाढतात. हा आपल्या शि-यापेक्षा मऊसर असतो.
No comments:
Post a Comment