YouTube

Sunday, 27 October 2019

बटाटा साग

गरम गरम पुरी सोबत बटाट्याची रस्सा भाजी किती स्वादिष्ट लागते न. या ब्लोग मध्ये मी तुम्हाला देणार आहे आलू साग अथवा बटाटा साग ची रेसिपी. हि रेसिपी सहसा उत्तर भारतात सगळीच कडे खाण्यात येत. चवदार आणि रस्सा असल्यामुळे पुरी सोबत खायला हि चं वाटते.  पण त्याआधी हा ब्लोग शेयर करा तुमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि subscribe करा इ-मेल updates साठी.

Image result for बटाटा साग
Image credit: foodviva

साहित्य:
४-५ चांगले उकडलेले बटाटे - सोलून चिरून ठेवा
१ वाटी ओला नारळ खिसून ठेवलेला.
१ टेबल स्पून धने (धन्याची पावडर देखील चालेल)
४-५ सुकलेल्या लाल मिरच्या
थोडी चिंच पाण्यात अर्ध्या तसा आधी भिजवून ठेवलेली
गुळ - चवीनुसार
तेल, जिरे, मोहरी, हिंग - फोडणीसाठी
खिसून ठेवलेले आलं
हळद
लाल तिखट चवीनुसार
मीठ चवीनुसार
कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
सगळ्यात आधी मसाला तयार करून घ्या. त्यासाठी नारळ, सुकलेल्या लाल मिरच्या थोड्या तेलात घालून परतून घ्या. जर धने आख्खे असतील तर तेही परतून घ्या. धने पावडर वापरणार असाल तर ती नंतर टाकली तरी चालते. आता हा मसाला मिक्सर मधून चिंचेसोबत वाटून घ्या .
परत फोडणी साठी तेल गरम करा. जिरे, मोहरी तडतडले कि मग हिंग टाका. आलं व कढीपत्ता टाका आणि मग मसाला टाकून चांगला परतून घ्या.
आता चवीनुसार तिखट- मीठ व हळद टाकून त्यात बटाटे टाका. रस्सा करण्यासाठी पाणी टाका आणि सगळ एकत्र करा. गुळ टाका. चांगले उकळू द्या. हा पदार्थ तिखट छान लागतो म्हणून मिरची थोडी जास्त टाका. वाढण्याआधी कोथिंबीर टाकून एकदा मिसळून घ्या.
पुरी सोबत द्या.

टीप - १. जर ओला नारळ नसेल तर एक वाटी खोब-याच खीस अर्धा तास दुधात भिजवून ठेवा.
२. चिंच थोडी गरम पाण्यात भिजवल्यास लवकर चिंचेचे पाणी तयार होते
३. गुळ पाण्यात भिजवून ठेवल्यास लवकर विरघळतो.
४. पु-या बनवताना थोडं कणिक घट्ट लावा.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...