YouTube

Friday, 21 June 2019

राजगिरा लाडू

"राजगिरा" लाडू धरतीवरील "अमृत" ।।
समुद्रमंथनातून "अमृत" निर्माण झाल्यानंतर त्यातील काही थेंब जमिनीवर पडले , ते काही वनस्पतींनी शोषून घेतले असा पुराणात दाखला आहे, त्यापैकीच एक "राजगिरा" असावा।।
राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा।
राजगिऱ्या ला हिंदीत "रामदाणा" म्हणतात।
रामाचे स्मरण उपवासाच्या दिवशी व्हावे हा त्यामागचा उद्देश असावा। राम म्हणजेच अमरत्व असाही अर्थ असू शकतो।
उपवास आणि राजगिरा यांचं नातं अतूट ।
उपवासादिवशी पोटात कमी अन्न जाते त्यामुळे बऱ्याच वेळा थकवा येतो , त्याचा antidote म्हणजे राजगिरा।राजगिऱ्यात गव्हापेक्षा कैक पटीने जास्त लौह , कॅल्शियम, व्हिटॅमिन C, असते। त्याजोडीला fibre जास्त असल्यामुळे मलबद्धता होत नाही। किती सूक्ष्म आरोग्यविचार।
राजगिरा हा भाजून लाही स्वरूपात किंवा लाडू रूपात जास्त कार्यकारी।
भाजल्या मुळे त्यातील पाणी जाऊन हलकेपणा येतो तसेच तो पचायला सोपा होतो।
         लाडूमध्ये गूळ असल्याने तो अजून जास्तच आरोग्यहीतकरी ठरतो. राजगिरा व गुळातील जास्तीचे लौह,कॅल्शियम थकवा येऊच देत नाही।
यामुळे राजगिरालाडू हा "वैद्यमित्र" म्हणून ओळखला जातो।
          राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कर्बोदके आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपवासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी/बालकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या.
          राजगिऱ्या च्या नियमित सेवनाने मधुमेह व बीपी आपण लांब ठेवू शकतो. याचे कारण राजगिरा हा 0%फॅट असणारा पदार्थ आहे. शरीरात जमा होणारी अनावश्यक चरबी व पाणी राजगिरा शोषून घेतो.मधुमेहात फक्त राजगिरालाह्या खाव्यात.
          पित्तज शिरशूलात(migrain) राजगिरा लाडू अतिरिक्त पित्ताचे शोषण करतो जोडीला गुळ मधुर रसाचा असल्याने पित्त शमन करतो.अशा रुग्णांनी राजगिरा नित्य वापरात ठेवावा। तसेच साठवूनही ठेवावा।
         खलित्य म्हणजेच केस गळत असल्यास राजगिरा अमृतासम , याचे कारण राजगिऱ्यात असणारे प्रचुर minerals। जास्तीचे लौह,कॅल्शियम।
         बऱ्याच समस्यांचे मूळ असणारा राग। राजगिरा- रागावर मात करणारा राजा।
         राग जास्त असणाऱ्यांनी राजगिरा लाडू सतत खाल्यास त्यांचा रागही कमी होतो कारण पित्त व राग हे जुळे भाऊच असतात।
         बऱ्याच वेळा आजच्या मातांना सकाळी प्रश्न पडतो डब्यात काय द्यावे, अशा मातांसाठी राजगिरा लाडू वरदानच।
        उपवासाच्या दिवशी पोटात अन्न कमी गेल्यामुळे मलबद्धता होण्याची जास्त शक्यता असते। अशावेळी राजगिऱ्या तील extra fibre मलप्रवृत्ती साफ होण्यास मदत करते।
        भूक जास्त लागत असल्यास राजगिरा लाडू उपयोगी पडतो। कारण त्यातील अतिरिक चांगले घटक व पोषण मूल्य।
असा हा बहुगुणी राजगिरा लाडू। आपण खावे घरी आलेल्या अतिथींना द्यावे।
धन्यवाद।
शुभम् भवतू।।

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...