image credit: Secrete Recipe
साहित्य
१ १/२ कप दाण्याचा कुट
३ कप पाणी
मीठ चवीप्रमाणे
२ टीस्पून साखर
२-३ आमसुलं
१/२ टीस्पून जिरे
२ हिरव्या मिरच्या
२ टेबलस्पून कोथिंबीर
३ टेबलस्पून ओलं खोबरं
२ टेबलस्पून तूप
कृती
दाण्याचा कुट पाण्यात मिक्स करा. त्यात मीठ, साखर, आमसुलं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळी काढा. फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि मिरची (तुकडे करून) घाला. मिरची पांढरी झाली कि जिरे घालून आमटीला फोडणी द्या. दाण्याची आमटी व-याच्या तांदुळा बरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment