YouTube

Wednesday 5 December 2018

जीराफ

जीराफच्या पिल्लाला जन्म घेतांना कदाचीतच कुणी बघीतलं असेल. आईच्या गर्भातुन तो दहा फुट उंचीवरुन धाडकन जमीनीवर पडुन जन्म घेतो.खाली पडताच तो पाय पोटाशी दुमडुन शरीराचं गाठोडं करुन राहतो. अर्भकच ते ! ना त्याच्यात पायावर उभं रहाण्याची क्षमता असते ना ईच्छा. त्याची आई क्षणभर आपल्या जिभेने त्याचे नाक कान साफ करते आणि अवघ्या पाचच मिनीटानी ती अर्भकाला कठोरतेचा धडा शिकवते.

ती प्रथम पीलाच्या चारी बाजुनी फिरते आणि मग अचानक असं काही करु लागते की बघणारा आश्चर्यचकीत होउन जातो. अचानक ती अर्भकाला ईतक्या जोराने लाथ मारते की ते दोन कोलांट्या मारुन दुर जाउन पडतं.

यावरही जेव्हा ते बाळ उभही राहु शकत नाही, ती पुन्हा शक्तीशाली लाथ मारते. लाथा खाउन खाउन तो बिचारा अर्धमेला होउन जातो. तरीही त्याची आई प्रहार करत जाते. आणि एका क्षणाला ते पील्लु आपल्या कमजोर कोवळ्या टांगांवर कसेतरी उभे राहते.

आई जिराफ त्यावेळी पुन्हा विचीत्र काम करु लागते, ती आपल्या बाळाचे पाय जीभेने चाटु लागते. ती त्याला आठवण देउ ईच्छिते की तो आपल्या पायावर कसा उभा राहीला. जंगलात आता धोक्याच्या परीस्थितीत एका उडीतच पिल्लाला सुरक्षीत ठिकाणी जावे लागणार आहे.

जिराफच्या ज्या पिल्लांना आईचा लाथांचा प्रसाद मिळत नाही, ते जंगलातील हींस्त्र श्वापदांचा बळी पडतात.
जगात असे अनेक लोकं आहेत, जे कठोर मेहनत करुनही धुत्कारल्या जातात, त्यांच्यावर नियती असेच एकामागोमाग एक प्रहार करत जाते.

परंतु जितक्या वेळा त्या़च्यावर प्रहार होतो तीतक्या वेळा ते खचुन न जाता पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागतात. अशा लोकांना पराजीत करणं वा त्यांच्या ध्येयापासुन परावृत्त करणं अशक्य आहे. आणि एका क्षणी आयुष्याच्या एका सुंदर वळणावर त्यांना त्यांच ध्येय मिळुनच जातं ज्याकरता त्यांनी ईतक्या यातना सहन केल्या.

एक मासाचं अर्भक हे करु शकतं, आपण तर धट्टेकट्टे माणसं आहोत. चला उठुया नव्या जोमाने. नवीन क्षितीजांकडे जाण्यासाठी. एक सुर्य झाकाळला म्हणुन काय झाले. अनंत सुर्य अनंत क्षितीजे आपली वाट बघत आहेत...

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...