नवरा- अगं ऐकलस का?
बायको- काय हो ?
नवरा- अगं डान्सबार पुन्हा चालू होणार.
बायको- जळलं मेलं यांचं लक्षण
नवरा- मी म्हटलं होतं ना "अच्छे दिन आनेवाले है"
==================================
पेपर सुटल्यानंतरच्या प्रतिक्रीया
दहावी अ :- सगळं सोप्प होतं
दहावी ब:- काही प्रश्ऩ सोपे होते
दहावी क:- बरा होता पेपर
दहावी ड:- मँडम काय दिसत होती ....!!
=================================
पती:-आज घर अगदी छान आवरलेल दिसतंय. तुझं व्हाॅटस अॅप बंद होतं का?
पत्नी:-नाही हो,फोनचा चार्जर सापडत नव्हता. तो शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल!!!
=================================
आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेँड सोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात..
ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या!
=================================
पाणी कपात केल्यावर पुणेकरांनी मनापासून पावसाला आमंत्रण केले ............... एरवी त्यांना कोणी ही दुपारी आलेलं खपत नाहीं ।।
================================
मुलाचा बाप :-आपल्या मुलाला बेदम मारत असतो.
शेजारी:- का मारताय एवढं ,कायझाल ?
मुलाचा बाप : - उद्या ह्याच्या शाळेचा निकाल आहे
शेजारी: मग आज का मारताय.
मुलाचा बाप: अहाे मी उद्या गावाला चाललाेय
================================
"दहीहंडी" आणि "मुलगी" चांगली दिसली म्हणून कोणत्याही "थराला" जाऊ नये !
थोबाड फुटण्याची दाट शक्यता असते !
================================
एक माणूस रविवारी सायकीयाटरीस कडे जातो-
माणूस - डाॅ साहेब माझी बायको मला काही महत्वच देत नाही. नेहमी चीडचीड करते. माझ काहीच ऐकत नाही. तुम्ही तीला समुपदेशानी शांत करू शकाल?
सायकीयाटरीस - अरे बाबा ..हे ऐवढ सोप असतं तर मी रविवारी दवाखाना उघडून बसलो असतो का?
================================
मुलगा जेव्हा बाबांचे ऐकतो तेव्हा लोकं बोलतात ,,, संस्कारी मुलगा आहे तो...!!!
जेंव्हा आईचं ऐकतो तेव्हा लोकं बोलतात ,,, चांगला मुलगा आहे तो..!!!
बहिणीचं ऐकतो तेव्हा लोकं बोलतात ,, बहिणीवर खुप प्रेम आहे त्याचं..!!!
आणि बायकोचं ऐकतो तेंव्हा लोकं बोलतात ,, मेला बायकोचा बैल आहे नुसता ...!!!
================================
एका मठावर गेलो होतो . सात साधू सात चटईवर बसले होते...
मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले बाबा B.E. केलय पुढे काय करु?
बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,
"गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा..."
================================
No comments:
Post a Comment