माकडे पकडायची एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते.
माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते.
मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल.
माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या अवस्थेत माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी.
या सापळ्याला " मोहसापळा " असे म्हणता येईल. आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने " फलत्याग " नक्कीच मुक्तिदायक नाही काय?
Stay Happy! Stay Healthy! Stay Wealthy! Be liberated! |
Please like my FB page and invite your FB friends to like this |
https://www.facebook.com/Rohini-Gilada-Mundhada-172794853166485/ |
Please visit and read my articles and if possible share with atleast one needy person accordingly |
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.in/ |
http://taleastory.blogspot.in/ |
http://allinoneguidematerial.blogspot.in |
Watch my videos |
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA |
No comments:
Post a Comment