पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते.
जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.
खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला "भयसापळा " असे म्हणता येईल.
जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे.
हा आधार गेला तर, अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही!
Stay Happy! Stay Healthy! Stay Wealthy! Be liberated! |
Please like my FB page and invite your FB friends to like this |
https://www.facebook.com/Rohini-Gilada-Mundhada-172794853166485/ |
Please visit and read my articles and if possible share with atleast one needy person accordingly |
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.in/ |
http://taleastory.blogspot.in/ |
http://allinoneguidematerial.blogspot.in |
Watch my videos |
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA |
No comments:
Post a Comment