आपण एक दाणा पेरला असता, आणि निसर्गापासून एकच दाणा रिटर्न मिळाला असता तर माणसाची काय अवस्था झाली असती ? धान्य पेरावं का खावं सुचलं नसतं...
पण ईश्वरानं माणसासाठी अजब व्यवस्था करुन ठेवली आहे. आपण एक दाणा पेरला कि तो शेकडो , हजारो दाणे देतो. अगदी निसर्गाच्या याच नियमानुसार जीवनात आपण काय पेरत आहोत ?
दुःख ,राग , द्वेष पेरत असेल तर निसर्गाकडून शेकडो , हजारो पटीने दुःख, राग, द्वेषच रिटर्न मिळेल. आणि आनंद, प्रेम, माणुसकी पेरत असेल तर शेकडो हजारो पटीने तेच आपल्याला या प्रकृतीकडून, निसर्गाकडून रिटर्न मिळणार यात काहीच शंका नाही...
==================================================
रात्रीनंतर उगवते, म्हणून ती पहाट असते!
वळणावळणाची असते, म्हणून ती वाट असते!
कलेकलेने बदलतो, म्हणून तो चंद्र असतो!
भरती ओहोटीत भडकतो, म्हणून तो समुद्र असतो!
क्षितीजापाशी झुकते, म्हणून ते आकाश असते!
आसवांनी जोडले जाते, म्हणून ते प्रेम असते!
क्षणोक्षणी रंग बदलते, म्हणून ते जीवन असते!
सुखदुःखाची देवाणघेवाणअसते, म्हणून ती नाती असतात!
=================================================
खूप खूप ताकद लागते आलेले अपयश पचवायला,
*डोळ्यात* आलेले *पाणी* पुसून *ओठांवर* हसू खेळवायला
काहीतरी *ध्येय* लागतं आपल्याला आयुष्यात जगायला,
*शेवटी* अपयशाचीच गरज असते आयुष्यात *खंबीर* बनायला.
=================================================
*घर* छोट असलं तरी *चालेल* पण *मन* *मोठ* असलं पाहिजे ..
=================================================
"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी काम करा.नाहीतर. ? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"
=================================================
आयुष्यात कुणाची पारख करताना त्याच्या रंगावरून न करता त्याच्या मनावरून करा...!!! कारण... पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता, तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या..!!!
=================================================
कुणी चांगले म्हणावे म्हणून काम करू नका, आपण करीत असलेल्या कामाने अनेकांचे भले होणार असल्यास ते काम सोडूच नका.
=================================================
जर आपला हेतुच शुध्द आणि प्रामाणिक असेल तर... आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्व नसते.
=================================================
चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात.
=================================================
मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थापणे केलेले काम कधीही व्यर्थ जात नाहीत."
=================================================
No comments:
Post a Comment