आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायच असतं...!
स्वप्न फरारीच बघायच ...का अपना बजाज मधे सुख शाेधायच
डिग्री घेऊन सुशिक्षित व्हायचे.... का संस्कार जाेपासुन सुसंस्कृत व्हायचे
आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवायची... का त्यांच्या उतार वयात वृद्धाश्रमाचा चेक फाडायचा.
आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायच असतं....!
स्वबळावर नविन देश पादाक्रांत करायचे ....का मराठी पणाच्या चौकटित स्वतःला जखडून ठेवायच
What's Up वर स्वःताच मनोरंजन करायच .......का आपुल्या सानूल्या सोबत सारीपाठात रमायच.
जोडीदार सोबत शरदाच चांदण शिंपायच...का समाजाच्या जोखडित वेळोवेळी मरांयच
आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायच असतं....!
तीनीसांजा देव्हार्यात दिवा लावायचा.....का विजय मल्याचा बिझनेस वाढवायचा.
मनाच्या गाभार्यात रातराणी फूलवायची...का निवडूंगाची कूंपण घालून विचार खुंटवायचे.
जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायच..... का एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं.
आयुष्य हे सुंदर असतं हे ज्याच त्याने ठरवायच असतं...!!!!
No comments:
Post a Comment