त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते . स्वातंत्र्याच्या जागृतीसाठी विवेकानंद आपल्या काही शिष्यांसह भारत भ्रमण करत होते . त्याकाळात अबू रोड रेल्वे स्टेशन येथे घडलेला एक प्रसंग .
स्वामी विवेकानंद आणि खेतडी संस्थानचे दिवाण जगमोहनलाल हे रेल्वेने मुंबईला निघाले होते .
त्यांना निरोप देण्यासाठी स्वामींचे एक बंगाली मित्र तेथे आले होते . तेवढयात एक इंग्रज तिकीट तपासणीस डब्यात आला. बंगाली मित्राकडे तिकीट नव्हते म्हणून तपासणीस त्याला गाडीतून उतर म्हणाला .
तो बंगाली मित्र रेल्वे कर्मचारी होता म्हणून त्याला तिकीट न काढता ही गाडीच्या डब्यापर्यंत येण्याची परवानगी होती . तो हे सर्व समजावून सांगू लागला तरीसुद्धा इंग्रज तपासणीस ऐकून घेत नव्हता .
हा सगळा प्रकार बघून स्वामींजी मधे पडले . तेव्हा तो इंग्रज उद्धटपणे बोलला , "तुम क्युँ बिच मे बात कर रहे हो?"
हे ऐकून स्वामींजी म्हणाले , "हिंदी भाषेत 'तुम' हे संबोधन तुच्छतेने वापरले जाते . तेव्हा 'आप' म्हणण्याचे साधे शिष्टाचार पाळावे."
त्यानंतर तो इंग्रज थोडा नरमला. आणि म्हणाला , "मला फारसे हिंदी येत नाही . मी तर केवळ ह्या माणसाला ....."
स्वामींजींनी त्याचे वाक्य पुर्ण होऊ दिले नाही आणि म्हणाले , "आपण स्वतः इंग्रज आहात . इंग्रजी भाषेत कोणालाही gentleman म्हणून संबोधन देतात हे आपणास माहित असणारच . तेव्हा आपले नाव आणि क्रमांक सांगा . प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी यांना अनादराची वागणूक दिल्याबद्दल मला तक्रार करायची आहे."
हे ऐकल्यावर तिकीट तपासणीस घाबरला आणि क्षमा मागून तिथून निघून गेला .
इंग्रजांपेक्षा आपण कुठल्याही बाबतीत कमी नाहीत . तेव्हा आपण ताठ मानेने आणि स्वाभिमानाने वागायला हवे. हा संदेश स्वामींजी सर्व भारतीयांना देत असत.
Home made envelope using old invitation card.
========================================================== |
For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit |
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.com/ |
=========================================================== |
For study material and other career related information and interesting puzzles please visit |
http://allinoneguidematerial.blogspot.com/ |
========================================================== |
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit |
http://taleastory.blogspot.com/ |
========================================================== |
For my original contents please visit |
http://www.IndiaStudyChannel.com/r/rohinigilada.aspx |
========================================================== |
For Peace and Harmony in Life please visit |
https://www.dhamma.org |
========================================================== |
Watch my videos here |
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA |
========================================================== |
No comments:
Post a Comment