YouTube

Saturday, 2 January 2021

राधार्पण

 

खुप सुरेख कोणी लिहिले माहिती नाही फॉरवर्ड करीत आहे

 

ऐन दुपारी कदंबाखाली

कृष्ण अन त्याच्या सहस्त्र पत्नी

रंग उधळूनी रास रचुनी

गोफ गुंफती हरी भोवती

 

इतक्यात सर्रकन अवचित रुतला

कमल चरणी हरीच्या ,काटा !!

राधा राधा सत्वर वदला

घननीळ नेत्री अश्रू दिसला !

 

कोमल रुक्मिणी, सुंदर भामा  

जांबुवंती अन वदली कमला

बसता उठता राधा राधा

नसे अर्थ का आमुच्या प्रेमा ?

 

सोळा शृंगार तुझ्याचसाठी

घास मुखी तव आमुच्या आधी

दारी लाविला पारिजात हा

सहस्त्र शैय्या तुझ्याचसाठी

 

चिडली भामा, रुसली रखमा

बरे नव्हे हे राधेला विसरा

कोण गोपी ती ? कुठल्या घरची ?

आम्हा समोरी का तिची  मुजोरी  ?

 

नकोस फसवू , शपथ तुज सखया,

कलंक न हा भाळी लागो तुझिया

राधेसाठी का व्याकुळ कान्हा

बोल काहीतरी उत्तर द्याया !!

 

उठले हरी  मग दूर जाहले 

टक लावूनी  अभ्र पाहिले 

शांत घटका सरली अन् मग,

मंजुळ वाणी बोलू लागले

 

वृंदावन जेव्हा टाकिलें,

अन् सोडिले राधेला,

पुन्हा न होणे भेट कदापि  

माहित झाले भाबडीला

 

माग म्हणालो आज काहीही,

माझी आठवण प्रतिक प्रीतीचे

बोलली राधिका झुकवून डोळे,

कधी न मागिले आज मागते

 

मूर्ती तव मम  मनी सर्वदा,

परी  विनवणी करते तुजला

सल जरी इवला,  अंगी रुतला

डंख तयाचा व्हावा मजला !

 

कमलदल-सम चरणांना तुझिया

पायघड्या मम ह्रदयीच्या व्हाव्या

चाललास जरी दोन पावले,

क्षेम कुशल तव मज धाडाव्या

 

म्हणून सखये ओठी राधा

दोन  तन,  मन एकच गाभा 

पाऊल जरी मी एक ठेवले

ती भू नाही काळीज स्मरते !!

 

म्हणून सांगतो प्रिय पत्नींनो,

राधा लौकिक अर्थाने मैत्रिण 

अर्धांगिनी जरी हरीच्या तुम्ही,

राधा मात्र माझे 'मी-पण'

 

राधे इतकी प्रीती मजवर

आहे कुणी का केली सांगा ?

म्हणून सांगतो निजभक्तांना

कृष्णा आधी बोला राधा

 

प्रीतीचे ते सुंदर मंदिर

कशी करावी दूर आठवण?

राधा भरली कणा कणातून

कृष्ण राहिला फक्त राधार्पण!!




 

My YouTube Channel:

https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA

Visit my blogs

allinoneguidematerial.blogspot.com

gyankadeep.blogspot.com

lokgitbhajanevamkahaniya.blogspot.com

notesdynamo.blogspot.com

My Telegram Channel

https://t.me/onlineaddaforall

Twitter Handle

https://twitter.com/rohinigilada2

 


No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...