YouTube

Tuesday, 1 September 2020

जीवन

वयाच्या ५१ व्या वर्षीही चष्मा नसलेले,
कसल्याही गोळ्या मागे लागल्या नसलेले जीवन जगायचंय ?
मग हे वाचा !
***
एक सत्य सांगतो. जे मला १४ वर्षांपूर्वी प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ जगदीश हिरेमठ यांनी सांगितले. (हार्ट attact मुळे icu मध्ये होतो मी, तर डिस्चार्ज देताना त्यांनी जे सांगितले तेच इथे सारांश सांगतोय)
*
ते म्हणाले कि, "मिस्टर धनंजय, एक लक्षात घ्या. जेवण हेच खरे औषध असते. त्यातून योग्य तो आहार आपण निवडून खाल्ला तर तब्येत चांगली राहते. जो ज्याचा सिझन आहे त्याचवेळी त्या भाज्या / फळे खा ! उगीच फ्रोजन मिळतात म्हणून हिवाळ्यात आंबे खाऊ नका !
आणि मुख्य म्हणजे दर दोन अडीच तासांनी थोडं थोडं खा. म्हणजे पोटाला तडस लागत नाही. मशीन हळूहळू छान काम करते. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे कामामुळे कितीही जागरण होऊ द्या. पण शेवटी गार दूध थोडी साखर टाकून प्या ! त्याशिवाय झोपू नका ! आणि त्याहून सोप्पा अजून एक उपाय म्हणजे दिवसभरात किमान ४ लिटर पाणी पोटात जाऊ द्या ! यामुळे पचनशक्ती उत्तम काम करते. आणि (महिलासाठी खास म्हणजे) त्वचा तजेलदार राहते. सुरकुत्या लवकर पडत नाहीत.
*
मी हे कटाक्षाने पाळतो. कधीही जेवणाची वेळ टाळत नाही. ऑफिसात तर पीए ला तेच एक काम आहे. टेबलवर तर एक तासाने ती पाण्याचा ग्लास आणून ठेवते. २ तासांनी ड्राय फ्रुट / ग्लुकोज बिस्कीट किंवा पावडर अथवा असे कहीतरी देत राहते. दुपारची व रात्रीची जेवणाची वेळ फिक्स आहे. त्यावेळेत अगदी कस्टमर जरी आले तरी त्यांना एकतर "या सोबत चार घास खाऊ" म्हणतो आणि त्यांनी नकार दिला तर त्यांना थांबायला सांगून शांतपणे जेवण करतो. उगीच अशावेळी घाईघाई करत नाही. प्रचंड वर्कलोड मुळे नाईलाजाने जागरण इतकी करतो पण कधीच ऍसिडिटी होत नाही. दर एक दीड तासाने खुर्ची सोडून उठतो. खाली फुटपाथवर पाय मोकळे करून येतो. ग्रीनरी (मीन्स हिरवी झाडे) पहातो. त्यामुळे डोळ्यांना आलेला ताण नाहीसा होतो. म्हणून तर १८ तास पीसीवर काम करू शकतो ! आणि वयाच्या ५१ व्या वर्षी देखील अदयाप चष्मा लागलेला नाही. फोटोत जो दिसतो तो झिरो नंबरचा आहे. गाडीवरून किंवा अन्य कुठे फिरताना डोळ्यात कचरा जाऊ नये म्हणून ती काळजी.
***
डीडी क्लास : मित्रानो आणि मैत्रिणींनो, काहीही करा, पण हे पाळा रे ! महिला वर्ग तर उगीचच त्यागाच्या मोड वर जाऊन स्वतःकडे दुर्लक्ष करतात. घरच्या सगळ्यांनी खाल्ले न मग माझे पोट भरले, असे मानतात. तसे करू नका. तुम्हीच चुकून आजारी पडला तर आणि कितीही प्रेम असले तर तुमच्या ऐवजी तुमचे सलाईन दुसरा कोणी स्वतःला लावून घेणार नाही. हे सत्य आहे. आणि बाई आजारी पडली कि सगळे घर आजारी पडते. हे लक्षात घ्या ! आणि हो एक सांगायचे राहिलेच, दिवसातून एक दोन वेळा तरी मस्त हसा रे ! छान वाटते स्वतःला ! मन आणि डोके शांत होते.
हे जग सुंदर आहे. मग आपले जगणे सुंदर का करू नये ?

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...