YouTube

Wednesday 11 March 2020

बटाटा चिवडा


साहित्य
४ मोठे बटाटे  मोठे छिद्रं असलेली किसणी जाड प्लास्टिकची शिट (किमान ३ फुट x ३ फुट) शेंगदाणे तिखट साखर  मीठ बटाटयाचा किस तळण्यासाठी तेल

कृती
रात्री बटाटे प्रेशर कूकरमध्ये ४-५ शिट्ट्या करून शिजवावे. कूकरमधून काढून पेपरवर काढून घ्यावे. रात्रभर बाहेर ठेवावेत. दुसर्या दिवशी सकाळी ९-९.३० च्या सुमारास उन्हात प्लास्टिकची शिट घालावी. बटाटे सोलून घ्यावेत. बटाटे थेट प्लास्टिक शिटवरच किसावे. बटाटे किसताना किसणीवर वरून खाली अशीच डिरेक्शन ठेवावी. एकदा किसून झाले कि बटाटा किंचित किसणीपासून उचलावा आणि पुन्हा वरून खाली अशी डिरेक्शन ठेवावी. किसणी आणि प्लास्टिक शिटमध्ये १/२ फूट अंतर ठेवावे. बटाटा किसताना प्रत्येक वरून खाली अशा डिरेक्शन नंतर किसणी थोडी पुढे करावी. म्हणजे किसलेला किस मोकळा राहिल, एकावर एक पडणार नाही. अशा प्रकारे १-२ उन्हं दाखवून किस कडक वाळवावा. गरम तेलामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे तळून घ्यावे. शेंगदाणे बाजूला काढून बटाटा किस तळून घ्यावा. किचन टॉवेल किंवा टिश्यू पेपरवर अधिकचे तेल काढून टाकावे.तळलेला किस थोडा गार झाला कि त्यात मीठ, पिठीसाखर, लाल तिखट आणि तळलेले शेंगदाणे घालून एकत्र करावे.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...