====
भर उन्हाच्या गं पारी
माह्या बापाचं राबनं
काळ्या आईच्या गं उदरी
फुलं हिरव्या आसवांच रान
माह्या बापाचं राबनं
काळ्या आईच्या गं उदरी
फुलं हिरव्या आसवांच रान
येतो उसासा दाटून
त्याचं फाटकं गं धोतर
संगतीला माळरानावर
औत, नांगर हे मैतर
त्याचं फाटकं गं धोतर
संगतीला माळरानावर
औत, नांगर हे मैतर
रापलेला हात, सुरकूतला चेहरा
भुईची गं माया, सोडता सोडवंना
उगवतो घास, दाणा लेकरांच्या तोंडी
कशी सोडवावी देवा, दैवाची रं कोंडी
भुईची गं माया, सोडता सोडवंना
उगवतो घास, दाणा लेकरांच्या तोंडी
कशी सोडवावी देवा, दैवाची रं कोंडी
कष्टाच्या फडताळ्याला, चंद्रमौळी चादर
घामानं भिजलेला, मायेचा पदर नादर
लुगड्याला तिच्या रंगीबेरंगी ठिगळं
सुखात मिरवतं, तिचं फाटकं पातळ
घामानं भिजलेला, मायेचा पदर नादर
लुगड्याला तिच्या रंगीबेरंगी ठिगळं
सुखात मिरवतं, तिचं फाटकं पातळ
लेकरांच्या सुखासाठी
दोघ राबती गं किती
दिस रात एक करिती
ही माय बापाची महती
दोघ राबती गं किती
दिस रात एक करिती
ही माय बापाची महती
रिकाम्या गाडग्या मडक्याला
पराती न् काळ्या भगुण्याला
शिंकाळ्यात लटकं जगणं भयाण
चुलीवर रोज शिजत आमचं मरण।।
पराती न् काळ्या भगुण्याला
शिंकाळ्यात लटकं जगणं भयाण
चुलीवर रोज शिजत आमचं मरण।।
No comments:
Post a Comment