साहित्य
३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट३ ते ४ टेस्पून दही१ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरूनचवीपुरते मीठ२ चिमटी साखर (ऐच्छिक)चिमूटभर जिरेपूड (ऐच्छिक)
कृती
कृती
दही घुसळून घ्या. त्यात मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर, जिरेपूड, आणि दाण्याचा कूट घालून मिक्स करावे.वाटल्यास मिक्सरमध्ये एक-दोनदा काही सेकंदच फिरवावे.थोडी भरडसरच असावी. पण थोडी मिळून येण्यासाठी मिक्सर वापरावा.ही चटणी उपवासाच्या पदार्थांबरोबर (साबुदाणा थालीपीठ, साबुदाणे वडे, खिचडी) छान लागते. तसेच पोह्यांबरोबरही खायला चांगली वाटते.
No comments:
Post a Comment