Image credit: cookpad
साहित्य:
दोन मुठी साबुदाणा किंचित भाजून धुवून ठेवा. एका मोठ्या नारळाचा चव, गुळ आवडीप्रमाणे, जायफळ पूड अर्धा चमचा, एक टेबल स्पून साय.
कृती:
भिजलेल्या साबुदाण्याला साय लावून घ्या.
खोबरे, गुळ घालून पुन्हा एक तास ठेवा.
नॉनस्टिक pan मध्ये घालून शिजवा
कडेने सुटू लागल्यावर ग्यास बंद करून जायफळ घाला.
गार झाल्यावर लाडू वळा.
वर काजू तुकडा लावा.
न्याहारीला लाडवा बरोबर दुध प्यायला द्या.
No comments:
Post a Comment