YouTube

Monday 14 October 2019

राजमा चावल

राजमा चावल पंजाब चे एकदम पौष्टिक खाद्य पदार्थ आहे . येणा-या थंडीच्या दिवसात राजमा चावल बनवाण्याची एकदम सोपी पद्धत इथे लिहिली आहे पण त्या आधी हा ब्लोग शेयर करा .

पंजाबी राजमा चावल (Punjabi Rajma Masala recipe in Hindi) रेसिपी मुख्य फोटो
Image credit: Cookpad

साहित्य 
रात्र भर म्हणजे कमीत कमी आठ तास भिजवून ठेवलेला राजमा
लवंग
दालचिनी
तमालपत्र - तेजपत्ता
वेलदोडे
जिरे
मिरे
साजूक तूप किंवा सरसोच तेल
आले - अदरक - चवीनुसार खिसून - पण कमीत कमी १ चमचा
कांदा - ३
टमाटे - ३
लसून - १०-१२ पाकळ्या
लाल तिखट - चवीनुसार
साईचे दही - २ टेबल स्पून
मीठ - चवीनुसार
मोहरी
कढीपत्ता

भात / चावल 
तांदूळ - भात बनवण्यासाठी - कुकर मध्ये बनवून ठेवा  किंवा पातेल्यातही बनवले तरी चालेल.

कृती:
रात्रभर भिजवलेला राजमा लवंग, दालचिनी, तमालपत्र - तेजपत्ता, वेलदोडे, जिरे, मिरे घालून नरम शिजवा.
ग्रेवी साठी आले, कांदे, लसून बारीक वाटून घ्या.
साजूक तुपात / सरसोच्या तेलात थोडी मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणी द्या आणि बारीक वाटलेले कांदे, आले, लसून बदामी होईपर्यंत परतून घ्या.
टमाटे बारीक वाटून घ्या आणि मग ते कांद्यात घाला आणि खूप परता . मग शिजवलेला राजमा, मीठ आणि तिखट घालून एकदा चांगले एकत्र करा. रस्सा भरपूर ठेवा.
गरम गरम भातासोबत वाठा. कच्चा कांदा आणि लिंबू सोबत द्या.

धन्यवाद.
हि रेसिपी तुम्हाला कशी वाटली करून बघितल्यावर comment करा. शेयर करा. ब्लोग subscribe करा.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...