जयंती
एकाच दिवशी जन्मले, दोन पुरुष महान
एक झाला उंच, दुजा राहिला लहान
एकाची आरती, रघुपति राघव राजाराम
दूजाची कृती, जय जवान जय किसान
एकाचा स्वातंत्र्यासाठी अहिंसक सत्याग्रह
दुजाचा फक्त खऱ्यासाठी आश्वासक आग्रह
एकाला जगाने म्हटले आधुनिक बुद्ध
दुजाने शांतपणे जिंकले, देशावरचे युद्ध
दोघांचे जीवन सार्वजनिक अन् मृत्यु अकस्मात्
एकाची सर्वांदेखत हत्या, दुजाचा गुपचुप अपघात
एकाचा खुनी जगाला कारणासाहित कळला
दुज्याच्या नावाचा मुद्दाही राजकारणात गळला
एकाचे उभारले गेले देशभर अनेक पुतळे,
दुजाचे नावही कुणाला क्वचितच कळे!
एक आता पोस्टर आणिक नोटांवर हसतो
दुजा फक्त एकदाच पेपर, फोटोमध्ये दिसतो!
एकाचे विचार महान पण आचरतो कोण,
दुजाचे आचार महान पण विचारतो कोण!
देशाच्या भविष्याची कशी बाळगावी खात्री?
एकाच दिवशी जन्मले, दोन पुरुष महान
एक झाला उंच, दुजा राहिला लहान
एकाची आरती, रघुपति राघव राजाराम
दूजाची कृती, जय जवान जय किसान
एकाचा स्वातंत्र्यासाठी अहिंसक सत्याग्रह
दुजाचा फक्त खऱ्यासाठी आश्वासक आग्रह
एकाला जगाने म्हटले आधुनिक बुद्ध
दुजाने शांतपणे जिंकले, देशावरचे युद्ध
दोघांचे जीवन सार्वजनिक अन् मृत्यु अकस्मात्
एकाची सर्वांदेखत हत्या, दुजाचा गुपचुप अपघात
एकाचा खुनी जगाला कारणासाहित कळला
दुज्याच्या नावाचा मुद्दाही राजकारणात गळला
एकाचे उभारले गेले देशभर अनेक पुतळे,
दुजाचे नावही कुणाला क्वचितच कळे!
एक आता पोस्टर आणिक नोटांवर हसतो
दुजा फक्त एकदाच पेपर, फोटोमध्ये दिसतो!
एकाचे विचार महान पण आचरतो कोण,
दुजाचे आचार महान पण विचारतो कोण!
देशाच्या भविष्याची कशी बाळगावी खात्री?
जिथे निबंधासाठी गांधी आणि जयंतीपुरते शास्त्री!
No comments:
Post a Comment