YouTube

Wednesday, 16 October 2019

घोडचूक

जी व्यक्ती राग, रुसवा धरून बसते, ती सहजा सहजी दुसऱ्यांना क्षमा नाही करू शकत।
त्यामुळं सगळ्यात वाईट गोष्ट अशी होते की त्या माणसाची कुंडलिनी शक्ती ही मूलाधार चक्रातच अडकते।
मग तुम्ही कितीही उपासना करा, ध्यान करा, मंत्र जप करा...काय वाटेल ते करा, अजिबात उपयोग होत नाही कशाचाही।
दुसऱ्यांना माफ केल्यानं मूलाधार चक्र  जागृत  होतं ....अगदी आपोआपच होतं।  जागृत झालं तरच ते पास होऊ शकतं।
गाडी चालूच नाही झाली तर पुढं तरी कशी जाणार बरं?
पुष्कळ लोक खूप उपास तपास करतात, उपासना करतात, तीर्थयात्रा करतात, पण...... पण एखाद्याला माफ करू शकत नाहीत।
त्यामुळं कितीही, काहीही केलं तरी कुंडलिनी शक्तीची गाडी काही हलतच नाही।
मग ओरडायला मोकळे सगळे....इतकं देवाचं केलं पण काहीच उपयोग होत नाही...कसा होणार?
सर्व संत म्हणतात की, शत्रू मध्ये ही तोच लपलेला आहे...तो कोण? तर ईश्वर। ओशो म्हणायचे की....राम मे राम देखा तो क्या देखा? रावण मे भी राम देखो, तो जाने।
अध्यात्मात मिळवणं सोपं असतं, पण मिळालेलं टिकवणं अतिशय अवघड असतं....
मुळात ते कुठं वाया जात नाहीय ना, हे ही कळत नाही, हीच तर मोठी घोडचूक होते।एका गुरुशिवाय हे  कळायला काहीच मार्ग नसतो।
*आणि म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय ।*
*धरावे ते पाय आधी आधी ।।*
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्दी दे आरोग्य दे
सर्वाना सुखात आंनदात एेश्वर्यात ठेव
सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड पाहिजे
 *सुप्रभात*

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...