YouTube

Friday, 21 June 2019

साबुदाणा वडा (इन अप्पेपात्र)

साहित्य-
भिजवलेला साबुदाणा- २ वाटी
उकडलेले बटाटे- २ छोटे
दाण्याचे कुट - २ टे. चमचे,
लिंबु- अर्धा,
लाल तिखट- २ चमचे,
मीठ- चवीनुसार,
साखर- १ चमचा,
तेल.
क्रुती-
भिजवलेला साबुदाण्यात बटाटे किसुन मिक्स करावे.
वरील सर्व साहित्य-दाण्याचे कुट+लिंबु+लाल तिखट+मीठ+साखर साबुदाणा व बटाट्यात घालुन चांगले मिक्स करावे.
आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवुन घ्यावे.
अप्पे पात्रात थोडे तेल टाकुन त्यात साबुदाण्याचे छोटे वडे टाकावे.
दोन्ही बाजुंनी चांगले फ्राय करावे.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...