YouTube

Wednesday 16 January 2019

मंत्र मुळी हा सोडू नका.

⭐⭐⭐🚩

*◆॥ अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥◆*

*अनंतकोटी_ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ॥*

कितीक सरले कितीक उरले,
आयुष्याला मोजु नका.
मस्त जगूया आनंदाने,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

नाही पटले काही जरीही
उगाच क्रोधीत होऊ नका.
व्यक्ती तितक्या विचारधारा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

योग्य अयोग्य चूक बरोबर,
मोजमाप हे लावू नका.
विवेक बुद्धि प्रत्येकाला,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

सुख दुःख हे पुण्य पाप ते,
दैव भोग हे तोलू नका.
कर्म फळाच्या सिद्धांताचा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

खाण्या बाबत हट्टी आग्रही,
कधी कुठेही राहू नका.
खाऊ मोजके राहू निरोगी,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

संस्कारांचे मोती उधळले,
पैसा शिल्लक ठेवू नका.
पैसा करतो आपले परके,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

मत आपले,विचार,सल्ला,
विचारल्या विण देऊ नका.
मान आपला आपण राखा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

नित्यच पाळा वेळा,
सगळ्या वेळी अवेळी जागू नका .
पैश्याहुनही अमूल्य वेळा,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

नाही बोलले कुणी तरीही,
वाईट वाटुन घेऊ नका.
मौन साधते सर्वार्थाला,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

जगलो केवळ इतरांसाठी,
कुठेच आता गुंतू नका.
फक्त जगुया आपल्यासाठी,
मंत्र मुळी हा सोडू नका.
*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*

जाणा कारण या जन्माचे,
वेळ व्यर्थ हा घालू नका.
श्वासोश्वासी नामच घ्यावे,
मंत्र मुळी हा सोडू नका.

*श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!*🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...