जगात दोन प्रकारच्या वनस्पती आहेत.
एक - आपलं फळ स्वतः हुन देणाऱ्या..
उदा आंबा, पेरु, केळी इ.
दुसरी - आपलं फळ लपवून ठेवणाऱ्या..
उदा. गाजर ,मुळा,बटाटा,कांदा इ.
ज्या आपली फळे स्वतःहुन देतात त्यांना सर्वजन खत पाणी देऊन जीव लावतात.
अन् ज्या आपलं फळ लपवून ठेवतात त्यांना मुळा सहित उपटून काढलं जातं._
तसेच जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वतःहुन समाजाच्या सेवेसाठी खर्च करतो. तो समाजात मान सम्मान मिळवण्यात प्राप्त ठरतो. त्याची चांगली किर्ती समाजात शिल्लक राहते.
याउलट जो मनुष्य आपली विद्या, ज्ञान, धन, शक्ती स्वार्थापोटी लपवून ठेवतो.
दुसऱ्यांना देण्याची वृत्ती बाळगत नाही तो मुळासगट उपटला जातो.
No comments:
Post a Comment