YouTube

Wednesday 17 October 2018

शेख सलिम चिश्ती

सुफी संप्रदाय  - (6)
सम्राट अकबराच्या तीन विविध धर्माच्या पत्नी होत्या. जोधाराणी(हिंदू ) तुर्की बेगम (मुस्लिम ) मरियम (ख्रिश्चन )
बरेच दिवस मुलेबाळे न झालेला अकबर बादशाह अजमेर (खरे नाव अजयमेरू) येथील प्रख्यात सुफी अवलिया, ख्वाजा मोहिनुद्दीन चिस्ती यांच्या दर्गाहवर पुत्र व्हावा अशी मन्नत (नवस ) मागण्यासाठी गेले असता,त्यांना फतेहपूर शिक्री येथील सुफी अवलिया शेख सलिम चिश्ती यांचे कडे जावे असा दृष्टांत झाला !
सम्राट अकबर पायी चालत आग्र्याजवळील शेख सलिम चिश्ती यांचेकडे गेले आणि आपल्याला पुत्र व्हावा अशी इच्छा प्रकट केली ! शेख सलिम चिश्ती यांनी आपल्या दाराच्या चौकटीला धागा बांधण्यास सांगितले!
अकबराने त्याप्रमाणे केले,आणि खरंच कांही दिवसांनी जोधाराणी गरोदर राहीली आणि तीला पुत्ररत्न झाले ! आपल्या गुरूकृपेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,अकबराने आपल्या मुलाचे नाव ' सलिम' असे ठेवले!हाच सलिम इतिहासात जहांगीर बादशाह म्हणुन ओळखला जातो !
आपल्या गुरू जवळ सतत रहाता यावे म्हणुन सम्राट अकबर (खरे नाव मोहम्मद जलालुद्दीन ) यांनी फतेहपूर सिक्री हीच आपली राजधानी केली होती.पण तेथे पुरेसे पाणी नसल्याने कालांतराने यमुनेकाठी आग्रा येथे आपली राजधानी स्थलांतरीत केली.
मित्रांनो मी पुर्ण एक दिवस फतेहपूर सिक्री येथे फिरलो.अतिशय सुंदर आहे तेथील परिसर ! त्या ठिकाणी अकबराचे काळात उभारलेल्या अनेक महाल अजुनही चांगल्या स्थितीत आहेत.सगळ्यात लक्ष वेधुन घेतो तो बुलंद दरवाजा अतिशय भव्य असे हे प्रवेशद्वार आहे ! आत शेख सलिम चिश्ती यांची कबर आहे.तीच्या भोवती संगमरवरी कोरीव जाळ्या आहेत. त्याला नवसाचे असंख्य रेशमी धागे बांधलेले दिसतात ! जोधामहलमध्ये एक दगडात कोरलेला देव्हारा आहे,तेथे जोधाराणी श्रीकृष्णाची मुर्ती ठेवीत असे.गोकुळ अष्टमीला तेथे कृष्ण जन्माचा सोहळा होत असे या कार्यक्रमास शेख सलिम चिश्ती उपस्थित राहत असत व अकबर स्वत: कृष्णाचा पाळणा झुलवित असे तेथील गाईडने सांगितले !
सुफी संप्रदाय हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देत असत , यामुळे सगळ्याच सुफी अवलियाच्या दर्गाहवर हिंदूंची उपस्थिती लक्षणीय असते !

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...