YouTube

Sunday, 23 September 2018

पोस्ट

‍‍‍ FAMILY ‍‍‍
आज तिचा मुड जरा बिनसलेलाच होता ,एक तर् सकाळी सकाळी दुध नासल होत ....
रविवार असल्यामुळे उशीरा उठली होती ...तो अजुन जॉगिँग वरून आला नव्हता ....
खुप छान बाल्कनीत बसुन त्याच्यासोबत चहा प्यायचा मुड होता तिचा ......
रोज तो यायच्या आत तिचा चहा आणि त्याच्या आवडीच्या तुपात कडक केलेल्या गरमागरम  पोळ्या तयार असायच्या .......
त्याच्या सतत मोबाईल वर busy असल्यामुळे बोलणं हल्ली खुपच कमी झाल होत त्यांच्यात .....
....तिलापण आता ह्याची सवय झाली होती म्हणा किंवा मुकाट्याने सहन करत होती ....
पण आज जरा जास्तच चीडचीड झाली होती तिची .....
...तो आला,  फ्रेश झाला ..आज कोरा चहाच आहे तुझ्या नशीबात ,घे ....कप पुढे करत ती म्हणाली ....' अरे व्वा acidity कमी होते कोऱ्या चहाने ...अस म्हणत त्याने कप उचलला .......
पण एकंदरीतच तिच्या चेहऱ्यावरचे काहीतरी बिघडल्याचे भाव त्याच्या लक्षात आले होते ...
अशावेळी तो शांत राहणे पसंद करतो कारण समोरून कधी काय बॉम्ब पडेल याची गारंटी नसते ....
तू काल family ग्रूप वर टाकलेली तुझी कविता खुप छान होती ..तिने सुरवात केली ...oh thanks ..अंग खुप आवडलीय सगळ्याना माझ्या मित्रांच्या आणि business ग्रूप वर तर् कॉमेंट वर कॉमेंट येताएत ...तो म्हटला ..
hmm ....आणि family ग्रूप वर ? तिने विचारल
.....अग तु टाकलीस की कॉमेंट
....हो ....तुझ्या परवाच्या पोस्ट वर पण फ़क्त मीच कॉमेंट टाकली होती
...infact तुझ्या प्रत्येक पोस्ट वर फ़क्त मीच आणि मीच कॉमेंट टाकते ......
त्याने मोबाईल बाजूला ठेवला ....शांतपणे तिच्याकडे बघितलं आणि म्हटला ....तुला नेमकं काय म्हणायच आहे ? बोल ?
काही नाही रे , जीव तुटतो माझा तु रोज न चुकता काही ना काही family ग्रुप वर पोस्ट करतो ....पण कोणालाच काही कॉमेंट करावस वाटत नाही ? इतके सगळे busy असतात का रे ?
तुला जितक प्रेम तुझ्या family बद्दल वाटत त्याच्या एक टक्का तरी कोणाला तुझ्याबद्दल वाटते का याचीच शंका आहे मला ?
  ....लग्न करुन आले तेव्हा याच family च्या प्रत्येक व्यक्तिबद्दल तू एक एक तास बोलत होतास ....तुझ्या बहिणी तुझे भाऊ , काका , मामा , अगदी सर्वांच्याबद्दल ......
परवा रक्षाबंधन ला तुझ्या सर्व बहिणीना तू किती छान wish केलस ....एकीलाही काहीच कॉमेंट करावी वाटली नाही ? अशी असते का family ?
ते काही नाही , जिथे आपली कोणी कदर करत नाही अशा ठिकाणी आता अजिबात थांबायच नाही अस माझ स्पष्ट मत आहे ....एक तर् तु पोस्ट टाकण बंद कर किंवा सरळ आपण दोघं पण लेफ्ट होऊ या आता .. .......
.......तिचा चहा संपत् आला होता ,आणि ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही हे पण त्याच्या लक्षात आल होत .....
तो मंद हसला ,किचन मधुन एक मेणबत्ती घेऊन आला ...आणि पेटवू लागला .....अरे वेडा झाला आहेस का ?  भर सकाळच्या उजेडात तुला आणि मेणबत्ती कशाला हवीय .......
तो : नको ना ?
अग आपल अस्तित्व पण या मेणबत्ती सारखच असाव,
म्हणजे कुठे काळोख झाला की तात्पुरता थोडासा उजेड दाखवता येण्यासारख ....
आपण अस समजुया की आज सगळ्याच ठिकाणी भरपुर उजेड आहे ....
म्हणजे सगळेच आपापल्या आयुष्यात खुप आनंदी आहेत , आणि देव करो त्यांना आपल्या सारख्या मेणबत्ती ची कधी गरजही न पडो ,
...पण कोणाला पडलीच कधी गरज तर् आपण आहोतच न ...तात्पुरता उजेड द्यायला ....
.....आणि दुसरी गोष्ट .....कुठलीही गोष्ट आपण जर अपेक्षा धरून केली तर् त्या पाठीमागे किती त्रास आणि दुःख असेल हे आपण कधीच सांगु शकत नाही ...
माणुस एकदा आपल मानलं की त्याला अगदी आहे तस स्वीकाराव...
आणि प्रत्येक जण आज ज्याच्या त्याच्या व्यापात आहे ....
कोणी मला चांगल म्हणाव माझ्या पोस्ट ला like कराव म्हणून मी लिहीत गेलो, पोस्ट टाकत गेलो  तर् राहिलच ना सगळ....
मी जे करतो ते फ़क्त आणि फ़क्त माझ्या आनंदासाठी करतो .....
आणि माझ्या पोस्ट मुळे जर कोणाच्या चेहऱ्यावर थोडस जरी हसु आल तर् तोच आनंद द्विगुणित होतो ....बस एवढ साध आहे सगळ....
.....अग वेडी ,अस समज की माझ्या पोस्ट ह्या एखाद्या विमा पॉलिसी च्या हप्त्या सारख्या आहेत .....आज कोणीही वाचत नसेल ..रिप्लायही करत नसेल ....
पण उद्या जेव्हा मी नसेन ना तेव्हा हेच सगळे ..
अगदी scroll करुन करुन माझ्या सगळ्या पोस्ट वाचुन काढतील ......
....बस्स ....ती जोरात ओरडली ...
तिचे डोळे आता  पाण्याने डबडबले होते ,
तिने त्याला घट्ट मिठी मारली ......
......आणि रडत रडतच पुटपुटली ........
मला माहीत आहे
तु आता ह्याची पण एक पोस्ट करशील .....forwarded post

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...