माझ्या एक मैत्रिणीने पाठवलेली कविता "मनापासून आभार" - अती सुंदर रचना आभार व्यक्त करण्यासाठी. नक्की वाचा आणि मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी शेयर करा.
किती मानू आभार
शुभेच्छांचा संभार
प्रेम सरींचा वर्षाव
पुष्पगुच्छांची बहार
शुभेच्छांचा संभार
प्रेम सरींचा वर्षाव
पुष्पगुच्छांची बहार
मनापासून स्वीकार
करते सस्नेह नमस्कार
असाच स्नेह बरसावा
भेदतो ह्रदयास आरपार
करते सस्नेह नमस्कार
असाच स्नेह बरसावा
भेदतो ह्रदयास आरपार
मखमली मऊशार
संदेश गोड हळूवार
छेडती मनाची तार
आनंदाची झंकार
संदेश गोड हळूवार
छेडती मनाची तार
आनंदाची झंकार
असेच मिळो प्रेम अपार
लाभो साथ,नको तक्रार
अनमोल हिरे मित्रत्वाचे
आनंदी क्षणांचे साक्षीदार
लाभो साथ,नको तक्रार
अनमोल हिरे मित्रत्वाचे
आनंदी क्षणांचे साक्षीदार
तुमच्या छान छान शुभेच्छांनी माझ्या वाढदिवसाला एका आगळ्याच विलक्षण आनंदाच्या सणाची झळाळी मिळाली व माझा दिवस लख्ख प्रकाशाने उजळून टाकला...शब्द कमी पडतात खरेतर.खरच मनापासून आभार मानते.अशीच कायम आपुलकी असावी हीच सदिच्छा.धन्यवाद त्रिवार धन्यवाद!!
Nice information you had provided for kedarnath temple. Thanks for sharing the content.
ReplyDeleteKedarnath Temple