YouTube

Friday, 10 August 2018

साप आणि करवत

एकदा एक साप सुतारकामाच्या वर्कशॉप मध्ये पोहोचला. वळवळत जात असताना तो एका करवतीला घासून गेला आणि त्यामुळे त्याला किंचितशी जखम झाली, झटकन तो वळला आणि त्याने त्या करवतीचा चावा घेतला त्याबरोबर त्याच्या दातानां आणि तोंडाला चांगलीच इजा झाली. मग काय झाले आहे ते न समजावून न घेता त्याने असा समज करून घेतला की, त्या करवतीने माझ्यावर हल्ला केला, मग त्याने असे ठरवले की, त्या करवतीला घट्ट विळखा घालायचा आणि सर्व ताकद लावून तिचा श्वास बंद पडायचा पण असे करताना सापालाच प्रचंड जखमा झाल्या आणि तो विव्हळत मरण पावला.
   काही वेळा रागाच्या भरात आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि ज्यांनी आपल्याला इजा पोहचवली आहे अशांना दुखावतो, पण शेवटी असे लक्षात येते की, आपण स्वतःलाच आणखी इजा करून घेतली आहे.
   आयुष्यात काही वेळा परिस्थिती, माणसे, त्यांचे वागणे, त्यांचे बोलणे या सगळ्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरते. काही वेळा प्रतिक्रिया व्यक्त न करणें हेच अधिक योग्य ठरते कारण त्यामुळे नंतरच्या घातक आणि भयंकर परिणामांचा त्रास सहन करावा लागत नाही. त्यामुळे कधीही द्वेषाने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये यांची काळजी घ्या. कारण अन्य कशाही पेक्षा प्रेमातच जास्त ताकद असते.
आणि म्हणूनच स्वभाव समजून एखादे रिलेशन सुधारण्याचा प्रयत्न झाला तर जीवनात दुःख असणार नाही.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...