YouTube

Wednesday 25 October 2017

त्या रात्री खूप छान झोप लागली...

Gyan
ही  पोस्ट शेवट पर्यंत वाचा आणि प्रत्येकासोबत शेयर करा. 

आजकाल आपण सर्वच जण स्मार्ट फोन युजर्स झालो आहोत. कळत न कळत व्हाट्सएप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल साईट्स आणि अँप्स मध्ये गुंतत आहोत. आपला वेळ कुठे जातो काहीच कळत नाही. मी सहज अश्याच एका सोशल पोस्ट मध्ये वाचलेला अनुभव इथे शेयर करत आहे. नक्की वाचा कळेल कुठे चूक होते बऱ्याचदा आपल्या हातून. 

आपला अनुभव शेयर करणाऱ्या त्या महान व्यक्तीस माझे शतशः नमन कारण हे करणं सोपं जरी असलं तरी सोशल ऍप ऍडिक्शन मुळे आपणास फार अवघड वाटतं. 

रोजसारखीच सकाळ झाली !
व्हॉट्सअप तुणतुणले, न उघडताच कळले !!
ग्रुप्सवर "गुड मॉर्निंग" किणकिणले !! पण, मी पाहिलं नाही !

तडक उठलो आणि...
मोबाइलही नसलेल्या एका मावशीशी बोललो,
वयाने थकलेल्या तिच्या थरथरत्या आवाजात
मायेनं किणकिणली, "काळजी घे गं" तिला म्हटलं,
डोळ्यात पाणी तरळलं का...?. कळलं नाही.

फेसबुक क्लिककडे सवयीने हात गेला,
फेस फिरवून मी तो दुसरीकडेच नेला.

शेजारच्या काकांकडे डोकावले... त्यांचा "फेस" कित्येक दिवस पाहिला नव्हता,
त्यांना तब्येत विचारली...
ते शुगर आणि डॉक्टरवर अथक बोलत राहिले..
जाता जाता म्हणाले... सांभाळ रे.. किती धावपळ करतोस..!
मी नकळत वाकलो... पायाला हात लावले. का...? . कळलं नाही.

दिवसभर व्हॉट्सअपवर जोक्स येत राहिले, आणि ..
"मस्ट शेअर पोस्ट" नी तर व्हॉट्सअप भरून वाहिले..
तरी अजिबात उघडले नाही.

सकाळ संध्याकाळ, जेवलास का..., निघालास का... म्हणत
माझ्या काळजीचा वसा घेतलेल्या आईला स्वत:हून फोन लावला
"काय रे .. काय झालं..." तिचा स्वर कापरा झाला,

तेव्हा कळलं कामाशिवाय करतच नाही तिला फोन !
अपराधी वाटून मी बोलत राहिलो.. बोलतच राहिलो.. ती तृप्त होईपर्यंत !
शेवटी तीच म्हणाली... अरे देवा.. गॅसवर दूध आहे.. ठेवते रे.!!
दूध नाही.. पण काहीतरी नक्कीच ऊतू गेलं... का...? .कळलं नाही.

संध्याकाळ झाली... घरी आलो लवकर
फेसबुक ट्विटर चिवचिवत होतंच
पण आजूबाजूला चिवचिवणा-या माझ्या चिमण्या बाळांशी
चक्क गप्पा मारत बसलो त्यांच्याशी खेळलो... खूप हसलो !
त्यांचा तो चिवचिवाट खूप खूप गोड वाटला. का...? . कळलं नाही.

रात्री बायको जेवण वाढत होती फोन दिसणार नाही इतका दूर ठेवला
कढी खूप झक्कास होती.. भुरका मारत प्यायलो..
नुसतंच "लाइक" नाही तर कमेंट करून टाकली... बायको गोड हसली
या आधी कधी अशी हसली होती.. ? आठवलं नाही...

अंथरुणावर पडलो तेव्हा...  उशाजवळच फोन होता.
दिवसभरात माझं एकही शेअर नाही..
की पोस्ट नाही काय बोलणार.. आता !

कुणाचेही लाइक येणार नव्हते
कुणीही कमेंटही करणार नव्हते
कुणाच्या रिप्लायचीही वाट बघायची नव्हती
आजचे "लाइक्स"
आजचे "कमेन्ट"
आजचे "रीप्लाय"
सारे माझ्या डोळ्यात होते..
त्यांना जपत मी डोळे मिटले...

ब-याच दिवसांनी... त्या रात्री खूप छान झोप लागली... का...? . कळलं नाही.



सकाळी, संध्याकाळी, सणासुदीला नेहमी हा फोन नोटिफिकेशन देत राहणार आणि दिवसभर आपण चेक करत राहणार - हेच आपलं रोजचं झालं आहे. कधी हे पण करून बघा. काय अनुभव येतात कंमेंट करा. 

  • काही झालं तरी कमीत कमी आठवड्यातून एकदा दिवसभर मोबाईल चेक करायचं नाही. 
  • त्या दिवशी कुठलीही सोशल ऍप वापरायची नाही. 
  • त्या दिवशी एखाद्या अशा व्यक्ती सोबत नक्की बोलायचं जिच्याकडे साधा मोबाईल पण नाही - मिळणं कठीण आहे पण प्रयत्न करण्यासाठी घराबाहेर तर निघाल तुम्ही. 
  • शेजारी जे शेजार ग्रुप मधेच भेटतात त्यांना सुद्धा त्या दिवशी प्रत्यक्ष भेटा - थोडं अवघड आहे पण शेजारच्या वयस्क म्हाताऱ्या लोकांसोबत बोलून बघा कदाचित जीवनाचा नवा अनुभव माहीत पडेल हो की  नाही !
  • त्या दिवशी आपल्या आई वडिलांना विना कामाचा फोन लावा आणि बोला त्यांच्यासोबत आणि ते जर सोबत रहात असतील तर त्यांच्यासोबत त्यांच्या आवडीनुसार वेळ घालवा. नक्की मायेचा पाझर फुटेल तुमच्या स्वतःमध्ये. 
  • हे तर रोज करायला हवं - घरी लवकर येऊन आपल्या बालगोपाळांसोबत गप्पा मारायलाच हव्यात - नाहीतर आपलं वागणं बघून तेही मोबाईल ऍडिक्ट होतीलच की - कारण मोबाइल काळाची गरज आहे. मग आपण दोष देतो - पण स्वतः सोडू शकत नाही - म्हणून आपण स्वतः गप्पा माराव्यात - करून बघा - फार नवीन गोष्टी कळतील तुम्हाला. 
  • पुरुषांनो बायको सोबत बसा - मी महिलांनाही म्हणते जरा वेळ ते स्मार्ट खेळणं बाजूला ठेवून नवऱ्या सोबत बसा. गप्पा मारा - एक दुसऱ्यांना सुखी करतील असे कंमेंट करा आणि बघा मग संसार कसा चविष्ट होतो ते. 
या सगळ्या गोष्टी मी करते आणि रोज सुखाची शांत झोप झोपते - तुम्हीही करून बघा नक्की विलक्षण अनुभव येतील - आणि आपले अनुभव शेयर करायला मुळीच विसरू नका - बिनधास्त कंमेंट करा. 

धन्यवाद!


इमेज क्रेडिट: - गुगल प्ले 


Thanks for reading till the end. Please follow and share this blog. And here are some of my social links and other blogs. Please visit them.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...