चॉकलेट ची गोडी जिभेवर काही सेकंदच राहते....
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र शेवटपर्यंत हदयात घर करून राहते....
======================================================
आयुष्य हे समुद्र आहे,
हृदय हा किनारा आहे,
आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचे नसून...
त्या किना-याला किती स्पर्श करतात
ते महत्वाचं असत....
=====================================================
शब्दांना भावरूप देते, तेच खरे पत्र ॥
नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र ॥
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र ॥
दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे नाते
===============================================
आपल्या सावली पासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥
===================================================
वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा...............
==================================================
गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...
================================================
माझ्या मित्राचे हसू पाहून मी माझे दुखः विसरेन .....!
पण माझ्या मित्राचे दुखः पाहून मला कधीच हसू येणार नाही.....!
================================================
आज पुन्हा आला पाऊस भिजला सारा गाव
आणि मग काय ..?? खिडकिच्या काचेवर पुन्हा एकदा तुमच्या वहिनीचे चे नाव.
================================================
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये
================================================
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं. प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
================================================
पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते.
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते
No comments:
Post a Comment