'मुलगी' असतेच ग , खरचं लाघवी.......
म्हणूनच, 'घरटी एक' तरी जन्मावी..........
चिवचिवाटाने तिच्या, सार घर भरतं........
खुळावलेल घर, तिच्या भोवती फिरतं.........
तीचं असणं , मनाला देतं प्रसन्नता.......
तीच तर असते घराची खरी संपन्नता.......
तीच घेते, आईच्या मनाचा अचूक ठाव.......
कळतात तिला चेहऱ्यावरचे सूक्ष्म भाव.......
तिच्या स्पर्शातली जादू म्हणजे... जिभेवर साखर.......
विरघळतं बापाचं काळीजही कणखर.........
असतेच ती मुळात स्वभावाने चाणाक्ष.....
घरातल्या सगळ्यांवर असत तिचं लक्ष.......
" आई,आज तोंड का गं तुझ उतरलयं ?".........
"आई, दादाचं काहीतरी हल्ली बिनसलयं........ !"
"आई, आबांच्या उशीच कव्हर फाटलयं "........
"आई, आजीचं औषध कालच संपलय ".........
"आई, बाबांचा दिवसेंदिवस वाढतोय घेर "........
"आई कामवाली निट काढत नाही ग केर"..........
होऊ देत मोठी, ती आणि तीची सारी स्वप्नं.........
सोडवू दे तिचे तिलाच, पडलेले सगळे प्रश्न........
पंखातील बळावर, घेईल ती क्षितीज भरारी.........
तू मात्र, कच न खाता ,कर मनाची तयारी..........
कितीही दूर गेली, तरी तुटणार नाही नाळ.......
वियोगाच्या दुःखावर, फुंकर घालेल काळ........
कोण म्हणतं, मुलगी चालवत नाही आपला वंश.......
तीच्यातही असतोच न आपला एक सुंदर अविभाज्य अंश ?......
No comments:
Post a Comment