मला तू खुप आवडायची,
जेव्हा तू हसायची,
या कुंद कळयांना अनं,
मोहर कुठून फुटायचं...
मला तू खुप आवडायची,
जेव्हा तु बघायची,
मन तुझ्यात गुंतायचं,
अनं तुझ्या त्या केसात
गारवा कुठून यायचं...
मला तू खुप आवडायची,
जेव्हा तू पाहायची,
मन स्वप्नात रमायचं,
अनं पाहताना तुला
माझं भान नाही उरायचं...
मला तू खुप आवडायची,
जेव्हा तू बोलायची,
एकटक पाहवसं वाटायचं....
तुझ्या त्या ओठांचा स्पर्श,
शब्दांनी कसं जाणायचं..
मला तू खुप आवडायची....!!!
No comments:
Post a Comment