1===
कुणीतरी मला विचारल कि तुम्ही सगळ्यांची आठवण काढता , तर ते सगळे तुमची पण आठवण काढतात का? मी सांगितल मला नाती जपायची आहेत , स्पर्धा करायची नाही..!
2===
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
3===
स्वता:साठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण.... एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते.
4===
इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की... जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे !!
5===
कंठातून गाण्यात आणि गाण्यातून अंतरंगात जे नेतात ते सूर.....
अनुभवातून वाक्यात आणि वाक्यातून डोळ्यात जी चमकते ती बुद्धी...
वर्दीतून निश्चयात आणि निश्चयातून सीमेवर उभे असते ते धैर्य....
एकांतातून शांततेत आणि शांततेतून आनंदात जो लाभतो तो आत्मविश्वास...
सुयशातून सातत्यात आणि सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते ती नम्रता...
स्पर्शातून आधारात आणि आधारातून अश्रुत जी ओघळते ती माया....
हृदयातून गालावर आणि गालावरून स्मितेत जे तरंगते ते प्रेम...
इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री...
स्मृतितून कृतित आणि कृतितून समाधानात जी दिसते ती जाणीव....
मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण.....
"'जग' खुप 'चांगले' आहे. फक्त ....... .''चांगले वागता'' आलं पाहिजे.!
6===
जर माणसाने शिक्षणा आधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवा आधी आई वडीलांना समजुन घेतले,
तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही.
No comments:
Post a Comment