YouTube

Wednesday 30 December 2015

हिऱ्यासारखी शीतलता स्वत:मध्ये रुजवायला हवी


एकदा एका राजाने आपल्या राज्यातील लोकांना दोन हिरे दाखवले आणि त्यातला खरा हिरा कोणता हे ओळखावयास सांगितले. पण कोणालाच ते सांगता येईना. 
शेवटी एक अंध व्यक्ती तिथे आला व म्हणाला, 'मी सांगतो तुम्हाला त्यातील खरा हिरा कोणता तो.' अंध व्यक्ती ते दोन्ही हिरे बाहेर घेऊन आला. त्याने ते दोन्ही हिरे थोडा वेळ सूर्यप्रकाशात ठेवले व नंतर तो ते दोन्ही हिरे घेऊन राजाकडे आला व त्याला खरा हिरा दाखवला. 
राजा आश्चर्यचकित झाला, कारण अंध व्यक्तीनं योग्य हिरा ओळखला होता, त्या वेळी त्याला याबद्दल विचारले गेले तेव्हा त्याने सांगितले, 'जो खरा हिरा असतो तो कधीही गरम होत नाही, काच मात्र गरम होते. गरम होऊन ती तडकते सुद्धा. पण हिरा मात्र तसाच राहतो. म्हणूनच तर तो अनमोल असतो.'
म्हणून तुमचं अनमोल हिऱ्यासारखं आयुष्य जपायचं असेल तर तुम्हीही हिऱ्यासारखी शीतलता स्वत:मध्ये रुजवायला हवी. त्यासाठी दृढता आणा, दृष्टिकोन बदला, काचेपासून हिरा बनण्याची तयारी करा. कारण निश्चयबुद्धि विजयन्ति!


Affirmation:- मी माझ्या निश्चयावर दृढ आहे.
                       मी माझा दृष्टिकोण सकरात्मकतेने बदलत आहे। 
                       मी ही-यासमान शीतल होत आहे। 
                      
==========================================================
For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.com/
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
http://allinoneguidematerial.blogspot.com/
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
http://taleastory.blogspot.com/
==========================================================
For Peace and Harmony in Life please visit
https://www.dhamma.org
==========================================================
Watch my videos here
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA
==========================================================

1 comment:

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...