YouTube

Sunday, 13 July 2014

खरीखुरी आपुलकी उरली




रँडच्या वधानंतर सर्व अप्तेष्टांनी आणि मित्रमंडळींनी चाफेकर कुटुंबाकडे पाठ फिरविली. खुनाचा तपास पुण्याला चालू होता . त्या वेळी चाफेकरांना कोणीही भेटत नव्हतं . एके दिवशी दामोदरपंतांच्या आई लक्ष्मीबाई  आपल्या पतिराजांना म्हणाल्या , "आपण आता चिंचवडला जाऊ. इथे राहून काय करायचं आहे? चिंचवडला जाऊन मोरयाला साकडं घालायचं आहे मला!"
चिंचवडला गेल्यावर लक्ष्मीबाईंनी मोरयाला साकडं घातलं आणि अन्नपाणी वर्ज्य केलं .
अवतीभवतीचे लोक त्यांना भीतीनं भेटेनासे झाले . जवळचे लोक दूर गेले .
या गोष्टीला तिथल्या एका घराचा अपवाद होता . तो म्हणजे खोल्यांच्या घराचा! कृष्णाबाई खोले या त्यांच्या जिवाभावाच्या होत्या . लक्ष्मीबाईंनी अन्नपाणी वर्ज्य केलं आहे, हे कळाल्यावर कृष्णाबाई खोले यांनीही अन्नपाणी वर्ज्य केलं . तेव्हा लक्ष्मीबाई चाफेकर त्यांना म्हणाल्या , "मी एका घोरात पडले आहे म्हणून मी काही खातपीत नाही . पण तुम्ही कशासाठी देह झिजवता?"
यावर कृष्णाबाई खोले म्हणाल्या , "तुमच्या तिन्ही पोरांनी देशासाठी देहाचं दान केलं . त्या त्रिमूर्ती दत्तासाठी आम्ही काहीच नाही करायचं का? आता तुम्हीही अन्नपाणी वर्ज्य केलत. मग......"
ब-याच वेळानं लक्ष्मीबाईंनी अन्नाचा घास घ्यायचा मान्य केलं . पण सुखानं त्यांना तो घास घेता यायचा नाही . पोलिस यायचे आणि संशयाने अन्नधान्याचे आणि तिखटमिठाचे सारे डबे पालथे करून जायचे .
मग कृष्णाबाई खोले त्यांच्यासाठी रोज मागच्या दारानं कुणाच्या नकळत भाजीभाकरी नेऊन तुळशीवृंदावनाच्या कोनाड्यात ठेवायच्या आणि मगच स्वतः घास घ्यायच्या .
अशा संकट काळी आप्तेष्टांनी जिथे पाठ फिरविली तिथे शेजारी पाजारी सखे बनले . बेगडी आपुलकी सरली आणि खरीखुरी आपुलकी उरली.

Handmade envelope from old invitation cards.


==========================================================
For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.com/
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
http://allinoneguidematerial.blogspot.com/
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
http://taleastory.blogspot.com/
==========================================================
For my original contents please visit
http://www.IndiaStudyChannel.com/r/rohinigilada.aspx
==========================================================
For Peace and Harmony in Life please visit
https://www.dhamma.org
==========================================================
Watch my videos here
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA
==========================================================

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...