रीइन्व्हेन्ट - काळाची गरज
काल एका मित्रासोबत गप्पा मारत होतो. सॉफ्टवेअर लाईनचा माणूस आहे. सांगत होता, कामाचा प्लॅटफॉर्म बदलला, सहा महिने शिकायला लागले पण आता अॅट पार आहे, दोन वर्षात हाही प्लॅटफॉर्म बदलेल आणि मग परत नवे शिकावे लागेल. बेसिक्स जरी तेच असले तरी नवे शिकतच रहावे लागेल. स्वतःला रीइन्व्हेन्ट करावेच लागेल.
फोटोग्राफीत देखील काय झाले? ब्रोमाईड एक्सपोझर वरून डिजिटल एसएलआर आणि आता मिररलेस. थोडे थोडे बदलत गेले आणि नवे शिकावे लागले. डार्करूममध्ये फोटो धुणारी माणसे होती, त्यातल्या काही लोकांनी फोटोशॉप शिकून घेतले आणि व्यवसायात कायम राहिले. ज्यांनी फोटोशॉपला टांग मारली ते आउट ऑफ जॉब झाले.
एक ओळखीचे काका आहेत, बाबांसोबत बँकेत होते. बाबांनी व्हीआरएस घेतली आणि काही काळात बँकेत कोअर बँकिंग आले. काका या नवीन टेक्नॉंलॉजीत स्वतःला रीइन्व्हेन्ट करू शकले नाही, त्यांना इच्छा नसतांना व्हीआरएस घ्यावी लागली.
आता आपण फार काळ चॉकलेट हिरो करू शकणार नाही हे अक्षय सारख्या फार कमी नटांच्या लक्षात येते. अॅक्शन या जॉनर मध्ये तो मास्टर होताच. त्याने देखील स्वतःला रीइन्व्हेन्ट केले. पॅटर्न बदलला, कमी खर्चात स्वतः देशभक्तीपट काढू लागला. काही लोकांना आवडले, काहींना नाही आवडले. पण तो मार्केटमध्ये टिकून राहिला. नुसता टिकला नाही तर त्याने आपल्या फॅन्सच्या संख्येत लक्षणीय भर घातली.
सेट्स बनवणाऱ्या लोकांना काय मान होता बॉलीवूडमध्ये. आजही आहे पण आता व्हीएफएक्स आले आहे. बाहुबली सारखा सिनेमा मोस्ट ऑफ द टाइम ग्रीन रूममध्ये चित्रित झाला.
स्वतःला रीइन्व्हेन्ट करत राहणे ही आता काळाची गरज आहे. त्यात जो मागे पडेल ती कामाधंद्यातून मागे पडेल.
वकिली सल्ला देणारी सॉफ्टवेअर आलीत म्हणे आता. मायनर वैद्यकीय सल्ला देणारी पण येतील, हू नोज.
इंजिनियर लोकांना तर दिवस रात्र शाळा असणार. टेक्नॉलॉजी हीच माणसे बदलून टाकतात.
मास्तर लोकांना देखील काही वर्षातच संपूर्ण डिजिटल व्हावे लागेल.
आज अनेकांना वाटू शकते, भारतासारख्या महाकाय देशात हे शक्य नाही. पण असे नसेल. गुगल सारख्या कंपन्या यावर काम करतात आहेतच. दहा वर्षांत लेकरु कदाचित एक टॅब घेऊन जाईल शाळेत.
हर्षा भोगलेने सुंदर पिचाईला एक फार सुंदर प्रश्न विचारला होता. नंबर वन होणे सोपे पण तिथे इतक्या जास्त वेळ टिकून राहणे कठीण, कारण अनेकांना आपण गुगल व्हावे असे वाटत असते, तुम्ही हे मॅनेज कसे करता?
सुंदर यावर म्हणाला, कारण आम्ही सतत काहीतरी रीइन्व्हेन्ट करत असतो, आज कोणता नवीन विचार कोणी सादर केला याला महत्व देतो.
रोज काहीतरी नवे मेंदूत खुपसून त्यावर विचार करणे ही काळाची गरज आहे. स्वतःला रीइन्व्हेन्ट न करणारी माणसे फार लवकर स्पर्धेतून बाद होतील.
शेवटपर्यंत वाचल्या बद्दल धन्यवाद. अश्याच माहितीपूर्ण लेखांसाठी या ब्लॉग ला शेयर आणि सबस्क्राइब करा आणि रेइन्व्हेन्ट बद्दल आपले काय नक्की कंमेंट करा.
No comments:
Post a Comment