YouTube

Tuesday 25 August 2020

नागपुरी बेसन

 बेसन म्हणजेच चुन - झुणका हा महाराष्ट्रात सगळीकडे खाल्ला जाणारा पदार्थ आहे. ज्वारी अथवा बाजरीच्या भाकरी सोबत बेसन छान लागते. बेसन कशे बनवायचे याची पाककृती जाणून घेण्याआधी या ब्लॉग ला शेयर करा आणि subscribe करा .

Image result for chun bhakar
Image Credit: Becauseanyonecancook

साहित्य:
एक कप डाळीचे पीठ ,
६-७ लसूण पाकळ्या - वाटलेल्या  ५-६ लसूण पाकळ्या ठेचलेल्या - फोडणीसाठी
२-३ हिरव्या मिरच्या - वाटलेल्या
कोथिंबीर - चीरलेली
१-२ कांदे बारीक चिरलेले
तेल
मोहरी
जिरे
कढीपत्ता
हळद
लाल तिखट - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
लाल सुक्या मिरच्या - २-३ (फोडणी साठी)

कृती 
नागपुरी बेसन किंवा विदर्भ स्पेशल कुठलीही भाजी म्हंटली कि तेल नेहमीपेक्षा थोडं जास्तच घ्या .
तेल गरम करून जिरे मोहरी टाकून कढीपत्ता आणि चिरलेले कांदे परतून घ्या. डाळीचे पीठ व हळद टाकून बदामी रंग येईपर्यंत परता.
लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे एकत्र करून वाटून घ्या आणि हा मसाला पाण्यात टाकून परतलेल्या बेसनात थोडं थोडं टाकून हळूहळू एकत्र करत रहा. पाणी थोडं थोडं टाकायचं आणि बेसन हलवत राहायचं - ग्यासची आच मंद ठेवायची म्हणजे गाठ्या होणार नाही आणि बेसन हि कढईला लागणार नाही.
मीठ आणि लाल तिखट टाकून एकदा शिजवून घ्या.

आता एक तडका पॅन घेऊन त्यात तेल टाका जिरे टाकून सुक्या लाल मिरच्या आणि ठेचलेला लसूण टाकून तडका - फोडणी तयार करा.

भाकरी सोबत बेसन देताना लसणाची फोडणी वरतून टाका.

तर कशी वाटली हि रेसेपी कंमेंट करून नक्की सांगा . धन्यवाद


No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...