साहित्य:
दीड कप बेसन
पाव कप रवा
पाव कप कणिक
मीठ व तिखट
१ मोठा कांदा
१ टमाटे
हिरवी मिरची
कोथिंबीर
सर्व बारीक चिरून एकत्र करून ठेवा
कृती:
सर्व पीठ एकत्र करून चवीनुसार तिखट मीठ टाकून भिजवून ठेवा. धीरड्यासारखे पीठ लागते. अर्धा तास पीठ भिजू द्या.
नॉनस्टिक तव्यावर डोसा बनवतात तसे पीठ पसारा आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा टमाटे कोथिंबीर हिरवी मिरची पेरा
बदामी झाल्यावर चिला तयार
पुदिना चटणी किंवा सॉस किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत खायला द्या
No comments:
Post a Comment